Published On : Tue, Jan 16th, 2018

मनपाच्या सर्व मालमत्तांचे अभिलेख तातडीने अद्ययावत करा

Advertisement

Meet NMC

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या सर्व मालमत्तांचे अभिलेख फारच अडगळीत आहेत. ते तातडीने अद्ययावत करून त्यांचे अंकेक्षण करा, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले. सोमवार (ता.१५) ला मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात स्थापत्य व प्रकल्प समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बैठकीला माजी महापौर प्रवीण दटके, समिती उपसभापती अभय गोटेकर, समिती सदस्या रश्मी धुर्वे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, नगर रचना विभागाचे सोनवणे प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

नागपूर शहरात नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, शासन तसेच खासगी संस्था व खासगी मालकीचे अनेक भूखंड आहेत. शहरात मनपाच्या मालकीच्या अनेक जमिनी असून मनपाला विविध संस्थांनी अथवा परिवाराने दानस्वरूपात दिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी जमिनी ह्या नासुप्र व शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी नागपूर महानगरपालिकेने जमिनी अधिग्रहीत केल्या आहेत. ह्या सर्व अधिग्रहीत केलेल्या जमिनीचे अभिलेख हे अद्ययावत करण्यात यावे, असे आदेश सभापती संजय बंगाले यांनी स्थावर विभागाला दिले. अद्ययावत केलेल्या सर्व मालमत्तांचे व भूखंडाचे अभिलेखाचे अंकेक्षण करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचनादेखील त्यांनी केल्या.

या प्रकारच्या जमिनींवर बेकादेशीरपणे ताबा मिळवून अतिक्रमण केलेले आहे. यापासून मनपाला कोणतेही उत्पन्न प्राप्त होत नाही. सार्वजनिक प्रयोजनासाठी नागपूर मनपाकडे जमिनी उपलब्ध होत नाही. या सर्व मालमत्तांचे अभिलेखांचे जतन व्यवस्थितरित्या नसल्यामुळे मनपा अनेक न्यायप्रविष्ठ प्रकरणात बाजू मांडण्यास असमर्थ आहे. यामुळेच नागपूर महानगरपालिकेला अनेक भूखंडापासून वंचित राहावे लागत आहे. या सर्व मालमत्ता व भूखंडाचे अभिलेख अद्ययावत करून त्यांचे अंकेक्षण दोन महिन्यात करा, त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश सभापती श्री. बंगाले यांनी दिले. दोन महिन्यानंतर अनियमितता आढळली तर, कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा त्यांनी दिला.

नागपूर महानगरपालिकेच्या संपत्तीच्या मिळकतीचा अभिलेख अद्ययावत व अंकेक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली. शहरात मनपाच्या मालकीचे ३७३४ भूखंड आहेत. त्यांची अंकेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्लम भागातील हायर परचेस ॲग्रीमेंट तत्त्वावर भूखंड हे २८०० आहेत, अशी माहिती स्थावर अधिकारी भुते यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement