Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Sep 23rd, 2019

  सही पोषन देश रोशन ” पिपरी ला जनजागृती

  कन्हान : – रामनगर पिपरी प्रभाग क्र ३ येथे आंगणवाडी व्दारे जनजागृतीपर रॅली काढुन “सही पोषन देश रोशन ” पालनपोषणा विषयी पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

  शनिवार (दि.२१) ला नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत प्रभाग क्र ३ रामनगर पिपरी येथील आंगणवाडी ९८ व ११५ च्या आंगणवाडी सेविका सुनिता मानकर व विजया मानकर हयाच्या व्दारे जनजागृतीपर रैलीचे आयोजन करण्यात आले होते.

  याप्रसंगी युवा समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार यांनी मुलांच्या पालनपोषणा विषयी विशेष माहीती बालगोपालांना व पालकांना देऊन ” सही पोषण देश रोशन ” च्या जय घोषात गाव भ्रमण करित जनजागृती केली. यावेळी आंगणवाडी सेविका सहीत बालगोपाल व गावातील पालक प्रामुख्याने उपस्थीत होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145