Published On : Mon, Sep 23rd, 2019

बीकेसीपी स्कुल कन्हान फुटबॉल संघ जिल्हा स्पर्धेत विजयी.

कन्हान : – जिल्हा क्रिडा परिषद नागपूर व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व्दारे क्रिडा संकुल नागपुर येथे झालेल्या पावसाळी जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान च्या १४ वयोगट मुलीच्या फुटबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावुन विभागीय स्तरावर प्रवेश निश्चित केला.

महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद नागपुर व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व्दारे सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात पावसा ळी जिल्हास्तरीय सांघिक फुटबॉल क्रिडा स्पर्धा क्रिडा संकुल नागपुर येथे घेण्यात आल्या.

यात शनिवार (दि.२१) ला बीकेसीपी स्कुल कन्हान च्या १४ वयोगट मुलीच्या फुटबॉल संघाच्या अंशिका यादव हिने गोल करून अंतिम सामन्यात भवनस आष्टी शाळेच्या संघावर १-० ने विेजय प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावुन विभागीय स्तरावर प्रवेश निश्चित केला.

या यशाबद्दल संघाने आपल्या यशाचे श्रेय क्रिडा शिक्षक श्री अमित ठाकुर व सविता वानखेडे हयाना दिले. फुटबॉल संघ मुली १४ वयोगटात जिल्हयात प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल यशस्वी विद्यार्थीनी खेडाळु संघाचे व क्रिडा शिक्षकांचे शाळेचे संचालक राजीव खण्डेलवाल, शाळेच्या मुख्याध्यापिका कविता नाथ मँडम, युनिश कादरी, विनयकुमार वैद्य सर व सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.