नागपूर : जिल्ह्यातील lगोंडखरी येथील नो-एंट्री प्वाइंटवर ट्रॅफिक पोलिसांनी एका संशयित वाहनाला थांबवले असता मोठा प्रकार समोर आला. या वाहनात तब्बल ७० बैलांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. चालकाकडे कोणतेही वैध कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी वाहन जप्त करून चालकाला वाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
नंबर प्लेट कपड्याने झाकलेली-
ही गाडी उत्तर प्रदेश पासिंगची असून ती वेगाने नागपूरकडे येत होती. पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता वाहनाची नंबर प्लेट कपड्याने झाकलेली असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.
७० बैलांसह वाहन जप्त-
तपासणीदरम्यान वाहनात सुमारे ७० बैल भरलेले दिसले. चौकशीत चालकाने सांगितले की हे बैल सागर येथून आणले असून हैदराबादला नेले जात होते. मात्र, त्याच्याकडे वाहतुकीसंदर्भात कोणतेही वैध दस्तऐवज नव्हते.
पोलिसांची कारवाई-
पशुसंवर्धन अधिनियम आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय असल्याने पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले. चालकाला अटक करून पुढील कारवाईसाठी वाडी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.