Published On : Sat, Sep 19th, 2020

अवैध रेती तस्कराच्या मुसक्या आवळल्या रेती चोरी प्रकरणात चार ट्रक घेतले ताब्यात

काटोल पोलिसांची कारवाई

काटोल : सावनेर खाप नदीपात्रातुन रेतीची अवैध तस्करी करणाऱ्या विरुद्ध काटोल पोलिसांनी आज पहाटे धडक कारवाई प्रारंभ केली असून काटोल शहरातून अवैध रित्या रेती वाहून नेत असलेल्या 4 ट्रक ला जप्त करण्यात आले आहे पहाटे अचानक झालेल्या कारवाईने या मार्गावर रेती तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

सावनेर खापा तालुक्यात नैसर्गिक साधनसंपत्ती ने परिपूर्ण आहे या भागातील अनेक घाटावरून जिल्ह्यातीळ तसेच जिल्ह्याबाहेरील रेती टास्करांचा डोळा असतो जेसीबीच्या माध्यमातून अवैध उत्खनन करून ट्रक ट्रॅक्टरच्या माध्यमातून ही वाहतूक केली जाते कधी रॉयल्टी तर कधी रॉयल्टी न काढता तर कधी एक रॉयल्टी वर दोन तीन ट्रिप हे तस्कर मारतात यामुळे शासकीय महसूलाला चुना लागण्यासोबतच नैसर्गिक साधनसंपत्तीचे अपरिमित नुकसान होते.


सावनरे खाप वरून ते तस्कर कधी सावरगाव तर कधी तिष्टी
मार्गाने ही अवैध वाहतूक करीत असत काही दिवसांपासून या तस्करांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता काटोल विधानसभा आजरी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभा असल्याने या अवैद्य रेती तस्करील आळा कधी बसणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होती मात्र या उधानाला आजच्या कारवाई ब्रेक लागला आहे

शनिवार पहाटे काटोलचे ठाणेदार महादेव आचरेकर गस्त घालीत असताना रेती गाडी ओव्हरलोड केल्याचे आढळुन आले शहानिशा केली असता ही अवैध वाहतूक असल्याचे आढळून आहे लागलीच ही माहिती वरिष्ठांना दिली व चारही ट्रक व त्यांचे वाहक यांना ताब्यात घेतले आहे पुढील कारवाई काटोल पोलीस करीत आहे.जप्त करण्यात आलेल्या ट्रक व वाळूची एकूण किंमत 48 लाख 85 हजारांची मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गाडी क्र.1.एम एच 40 बी एल 8884,2.एम एच 40 एके 9535,3.एम एच 32 ए जे 9696 या गाड्यांवर ओव्हर लोड व रॉयल्टी नसल्याने कलम 379 आय पीसी सह. कलम 130/177 अंतर्गत कारवाई करण्यात आली तर गाडी क्र 4 ची रॉयल्टी असल्याने त्याचेवर ओव्हरलोड ची कारवाई करून रॉयल्टी ची शहानिशा करण्याकरिता तहसील कार्यालयात पाठवीन्यात अली आहे