Published On : Fri, Jul 24th, 2020

7 लक्ष 51 हजार 896 रुपयांचा अवैध गांजा जप्त

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या इस्माईलपुरा परिसरात अवैधरित्या गांजा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच नवीन कामठी पोलिसांनी वेळीच योजनाबद्ध पद्धतीने काल 23 जुलै ला दुपारी साडे तीन वाजेदरम्यान इस्माईलपुरा येथे वकार पाटील यांच्या घरासमोर राहत्या घरात धाड घातली असता सहा बोऱ्यात ठेवलेले 62 किलो 650 ग्राम गांजा किमती 7 लक्ष 51 हजार 896 रुपये किमतीचा गांजा जप्त करीत आरोपी वसीम एजाज मो शरीफ वय 47 वर्षे रा नया गोदाम कामठी विरुद्ध भादवी कलम 2029 एनडीपीएस ऍक्ट अनव्ये गुन्हा नोंदवीत अटक करण्यात आले.

ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल, एसीपी मुंडे यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल, एपीआय सुरेश कर्नाके, डी बी स्कॉड चे पप्पू यादव, मंगेश लांजेवार, सुधीर कनोजिया,राजा टाकळीकर,उपेंद्र यादव, सुरेंद्र शेंडे, संदीप गुप्ता,संदीप भोयर, निकिता गोडबोले आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे

संदीप कांबळे कामठी