Published On : Sat, Jul 31st, 2021

घरकुल मध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर नगर परिषदेने कसला शिकंजा

– कारवाई सुरूच राहील – मुख्याधिकारी हर्षल गायकवाड

रामटेक – नुकतेच काही दिवसा आधी आझाद वार्ड परिसरात नगर परिषदेच्या मालकीच्या घरकुलांमधून अवैध दारूचा व्यवसाय होत असल्याने या ठिकाणी दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून कारवाई केली. व ४३५ लिटर मोहफुल दारुसह २९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता ह्या कारवाईने परिसरात चांगलाच हडकंप माजला होता

घरकुलामध्ये अवैध व्यवसाय करीत असलेल्या घरकुलांना सिल करण्याची मोहीम नगर अभियंता गणेश अंदुरे यांच्या नेतृत्वात राबविण्यात आली. ह्यामध्ये घरकुल क्रमांक ५२ मद्ये नगर परिषदे द्वारे सिल लावण्यात आली असून, त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. नगर अभियंता गणेश अंदूरे, कनिष्ठ अभियंता सौरभ कावळे, कर विभाग प्रमुख महेंद्र जामदाडे, शिपाई दीपक आकरे, नील्या पडोळे, बांधकाम विभाग गजानन महाजन, जगदीश गवळिवार यांनी भाग घेतला.

“ज्या लाभार्थ्यांना आम्ही घरकुल वाटप केलं होत ते लाभार्थी त्या घरकुलात रहात नसून तिथे अवैध धंदे सुरू होते त्यांना आम्ही नोटीस पाठविले असून १५ दिवसांच्या आत जर ते लाभार्थी घरकुलात आले नाही तर शासनाच्या आदेशावरून पुढील कारवाई करण्यात येईल ,

घरकुल सारख्या राहण्याच्या ठिकाणी अवैध धंदे करणे हे कितपत योग्य आहे? घरकुल सारख्या ठिकाणी अवैध धंदे करणाऱ्याची आता खैर नाही.असे सांगून
ही मोहीम यापुढे अशीच सुरू राहील अशी माहिती मुख्यधिकारी हर्षल गायकवाड यांनी दिली…