Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jan 21st, 2019

  मोबाईल टॉवरला ना हरकत नसल्यास वीज तोडा : ना. बावनकुळे

  नागपूर: मनपा धंतोली झोनच्या जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे साफसफाई, गडरलाईन व अतिक्रमणाच्या तक्रारी सर्वाधिक आल्या. तसेच अवैध मोबाईल टॉवरमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या तक्रारींवर पालकमंत्र्यांनी अनधिकृत व ना हरकत प्रमाणपत्र न घेतलेल्या मोबाईल टॉवरचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणला दिले.

  जनसंवादाचा हा कार्यक्रम धंतोली येथे झाला. या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, झोन सभापती विशाखा बांते, अति आयुक्त ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष विकी कुकरेजा, नगरसेवक लता काडगाये, विजय चुटेले, वंदना भगत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात पालकमंत्र्यांकडे एकूण 60 तक्रारी प्राप्त झाल्या. शिक्षण, नगरभूमापन, मनपा बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, नझूल, करनिर्धारण विभाग, महावितरण, नासुप्र आदी विभागाच्या तक्रारी अधिक होत्या. मनपा बांधकाम विभाग, नासुप्र व आरोग्य विभागाशी संबंधित तक्रारी सर्वाधिक होत्या.

  विनापरवानगी शहरात उभारण्यात आलेल्या मोबाईलच्या टॉवरबाबत मनपाने धोरण तयार करावे व त्याअंतर्गत मोबाईल टॉवरला परवानगी देण्याचे निर्देश देताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- मोबाईल टॉवरला विजेचे कनेक्शन देण्यापूर्वी महावितरणने मनपा सहायक आयुक्तांचे ना हरकत प्रमाणपत्र आहे का, याची शहानिशा करूनच वीज कनेक्शन द्यावे. नाल्याचे बांधकाम थांबले असल्याचे व साफसफाई होत नसल्याच्या 7 तक्रारी या कार्यक्रमात नागरिकांनी केल्या. झोनअंतर्गत नालंदानगर, धाडीवाल लेआऊट, पार्वतीनगर या भागात गडरलाईनचा त्रास लोकांना आहे. गडर लाईनमधील चौकेजचे पाणी लोकांच्या घरात येत आहे, तर काही नागरिकांच्या विहिरींचे पाणी गडर लाईनमुळे दूषित झाले असल्याचेही लक्षात आले.

  वैयक्तिक भूखंडांवर अतिक्रमण करण्यात आल्याच्या तक्रारींवरही त्वरित कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बॅनर्जी लेआऊट, मौजा बाबुळखेडा या भागातील रस्त्यांच्या तक्रारींवर रस्त्यांचे प्राकलने तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. शुक्रवारी तलावाचे कठडे दुरुस्त करणे व तलावातील कचरा काढण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली. मॉडेल मिल चाळीतील अतिक्रमण, चिचभवनमधील रस्त्यांच्या समस्या व भूखंडधारकांना नासुप्रकडून होत असलेल्या त्रासाच्या तक्रारी यावेळी पालकमंत्र्यांसमोर सादर करण्यात आल्या.

  शासनाकडून प्रत्येक झोनला बांधकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक झोनने आवश्यक कामांसाठी लागणार्‍या निधींचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच शासनाची सर्वांना भूखंड व सर्वांना घरे, पट्टेवाटप, सर्वांसाठी आरोग्य योजना, सर्वांसाठी अन्न योजना या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145