Published On : Sun, Mar 23rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

लाडकी बहीण योजनेसंदर्भात खरं सांगितले असते तर सरकारच आले नसते;अजितदादांच्या विधानाने खळबळ !

Advertisement

मुंबई : राज्याच्या तिजोरीवर लाडकी बहीण योजनेमुळे भार पडला आहे. पण या योजनेबाबत आम्ही खरं बोललो असतो तर आमचे सरकार आले नसते, असे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजना जेव्हा लागू करण्यात आली, तेव्हा पैशांचे सोंग आपल्याला करता येणार नाही, हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सांगितले होतं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

महायुती सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करण्याचा सर्वाधिक अनुभव सध्या अजित पवार यांच्याकडे आहे. लाडकी बहीण योजना जेव्हा लागू करण्यात आली, तेव्हा पैशांचे सोंग आपल्याला करता येणार नाही, हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सांगितले होतं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले की, मी जर त्यावेळी खरं सांगितले असते तर आम्ही परत आलोच नसतो. सरकार कसे येईल, हे बघणं महत्त्वाचे असते.

Gold Rate
23 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,36,300/-
Gold 22 KT ₹ 1,26,800/-
Silver/Kg ₹ 2,10,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आम्ही काय साधू-संत नाही –
अजित पवार पुढं म्हणाले की, आम्ही काही साधू-संत नाही. आमचंही काही व्हिजन आहे. ते प्रत्यक्षात आणण्याकरता प्रयत्न करणं आवश्यक आहे. केंद्रात आमचं सरकार आहे. त्यांची मदत घेऊन राज्याचं उत्पन्न वाढवून आपण मार्ग काढू, असं माझं मन सागंत होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळं त्यांना या सर्व गोष्टींची कल्पना आहे. आम्ही कुठलीही योजना बंद करणार नाही, असं आधीच सांगितलं आहे. जेव्हा केंद्र आणि राज्य सरकारची योजना एकसारखीच असते. तेव्हा आम्ही राज्याची योजना बंद करून केंद्राच्या योजनेचा लाभ घेतो. तसंच केंद्र सरकारच्या बिनव्याजी कर्जाच्या योजनेचा लाभ घेत आहोत”, असंही अजित पवार म्हणाले.

‘भटकती आत्मा’ विधानाचा वेगळा परिणाम झाला- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शरद पवारांना भटकती आत्मा असं म्हटलं गेलं. त्या विधानाचा वेगळा परिणाम झाला, असंही यावेळी अजित पवार म्हणाले. शरद पवार राजकारणात मुरलेले आहेत. त्यांनी या विधानाचा उपयोग करून माझा आत्मा भटकतोय, हे सांगायला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव देण्याकरता, दुधाला भाव देण्याकरता माझा आत्मा भटकतो आहे, असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घातला. त्यामुळे विधानसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही आरोप प्रत्यारोप न करता सरकारची कामं सांगितली. लाडकी बहीण योजना लोकांमध्ये नेली. त्याला आम्हाला लाभ झाला,असे अजित पवार म्हणाले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement