Published On : Tue, Jun 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

विश्व तंबाखूमुक्त दिनानिमित्त आयडीए नागपूर शाखेची ‘स्माईल फॉर टुमॉरो’ छायाचित्र स्पर्धा उत्साहात संपन्न

Advertisement

नागपूर : जागतिक तंबाखू निषेध दिनाचे औचित्य साधत इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) नागपूर शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्माईल फॉर टुमॉरो – वर्ल्ड नो टोबॅको डे फोटो कॉन्टेस्ट 2026’ या अनोख्या छायाचित्र स्पर्धेचा ग्रँड फिनाले आणि पारितोषिक वितरण सोहळा रामदासपेठ येथील सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

आयडीए नागपूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. पूनम हुडिया आणि मानद सचिव डॉ. अंशुल महाजन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या स्पर्धेचा उद्देश तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे तसेच निरोगी हास्य आणि तंबाखूमुक्त जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा होता.

या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध वयोगटांतील 170 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपल्या छायाचित्रांद्वारे निरोगी जीवनशैली आणि तंबाखूमुक्त समाजाचा प्रभावी संदेश दिला. स्पर्धकांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमाला नवरात्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सचिव प्रफुल गणात्रा, आरएसटी कॅन्सर इन्स्टिट्यूटचे डॉ. बी. के. शर्मा आणि लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नवरात्र हॉस्पिटलच्या दंत विभागाचे प्रभारी राजूभाई आचार्य आणि अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूटचे डॉ. ऋषिकेश फते यांचीही उपस्थिती लाभली.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून तंबाखूच्या व्यसनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक परिणामांवर प्रकाश टाकला. विशेषतः युवकांनी तंबाखूमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून निरोगी समाज घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मौखिक आरोग्य, निरोगी हास्य आणि व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी आयडीए नागपूर शाखेच्या उपक्रमांचे कौतुकही केले.

Advertisement

स्पर्धेतील विजेत्यांना ‘स्माईल चॅम्पियन’, ‘स्माईल क्वीन’, ‘टाइमलेस लिजेंड’, ‘एव्हरग्रीन आयकॉन’ आणि ‘सोशल मीडिया स्माईल स्टार’ अशा विविध गटांत ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी आयोजित कंटिन्यूइंग डेंटल एज्युकेशन (सीडीई) सत्रात डॉ. अभिषेक वैद्य आणि डॉ. चंदानी होतवानी यांनी तज्ज्ञ मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानांना उपस्थित दंतचिकित्सकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयडीए नागपूर शाखेच्या कार्यकारिणी समितीतील सदस्य, डॉक्टर आणि संपूर्ण आयोजन समितीने केलेल्या परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले. अनेक दिवसांच्या नियोजन, समन्वय आणि संघभावनेमुळे हा उपक्रम यशस्वी व संस्मरणीय ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाला शरद पवार डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, वर्धाचे अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक यांच्यासह डॉ. कृष्णा लाहोटी, डॉ. रसना अग्रवाल, डॉ. रश्मी टोंगे, डॉ. रोहित मुडे, डॉ. हिमानी देउलकर, डॉ. गणेश बजाज, डॉ. गीतिका सोनी, डॉ. सुनील बघेल आणि आयडीए नागपूर शाखेचे अनेक सदस्य व दंतचिकित्सक उपस्थित होते.

समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवर, स्पर्धक, प्रायोजक, सहकारी संस्था आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे आभार मानण्यात आले. “तुमचे हास्य हे कोणत्याही व्यसनापेक्षा अधिक शक्तिशाली आहे; चला, तंबाखूमुक्त उद्याची निर्मिती करूया,” या प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Advertisement
हेलमेट अभियान के बीच उठे नए सवाल

हेलमेट अभियान के बीच उठे नए सवाल

मानेवाड़ा दहन घाट में दिनदहाड़े खूनी झड़प, पुराने विवाद में युवक की हत्या

मानेवाड़ा दहन घाट में दिनदहाड़े खूनी झड़प, पुराने विवाद में युवक की...

मेलघाट आश्रमशाला में फिर छात्र बीमार #maharashtranews #amravati #ashramshala #bhojan #viral

मेलघाट आश्रमशाला में फिर छात्र बीमार #maharashtranews #amravati #ashramshala #bhojan #viral

जर्जर दीवार गिरने से रिक्शा चालक घायल #maharashtranews #accident #newsupdate #kalyandombivli

जर्जर दीवार गिरने से रिक्शा चालक घायल #maharashtranews #accident #newsupdate #kalyandombivli

बालासाहेब के विचारों पर चलें: पाटिल #maharashtranews #modi #sanjayraut #bjp #shivsena

बालासाहेब के विचारों पर चलें: पाटिल #maharashtranews #modi #sanjayraut #bjp #shivsena

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam #news

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges