नागपूर : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) नागपूर विभागाने प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ४१९ किलोहून अधिक सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. या कारवाईत सुमारे ६ लाख रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफडीएच्या पथकाने सोमवारी नागपुरातील बुनकर कॉलनी परिसरात छापा टाकून अजहर इक्बाल रहमान कुरेशी याच्या घरातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. आरोपी आपल्या निवासस्थानी या प्रतिबंधित पदार्थाचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.
छाप्यामध्ये सुमारे ४१९ किलो सुगंधित तंबाखू आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मालाची अंदाजे किंमत ६ लाख रुपयांच्या आसपास असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आणि विक्री केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व साठवणुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अशा अवैध व्यवसायांवर धडक कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रतिबंधित तंबाखू व तत्सम पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मंदिर प्रबंधन धर्माचार्यों को सौंपने की मांग #NarendraAcharya #RamMandir #Ratnagiri #EducationNews
प्रेम संबंध के विवाद में हुआ था खूनी संघर्ष #NagpurCrime #Crime #Police...
अदरक के दाम गिरने से किसान परेशान #maharashtranews #newsupdate #kisan #latestnews
हेलमेट अभियान के बीच उठे नए सवाल
मानेवाड़ा दहन घाट में दिनदहाड़े खूनी झड़प, पुराने विवाद में युवक की...
मेलघाट आश्रमशाला में फिर छात्र बीमार #maharashtranews #amravati #ashramshala #bhojan #viral




