Published On : Wed, Aug 19th, 2020

रेल्वेत विना परवानगी आईसक्रिम अन् दही

– राजधानी एक्स्प्रेसमधील प्रकार, काय करतात आरपीएफ, जीआरपी आणि वाणिज्य विभागातील अधिकारी, एकाची परवागी पुरवठा करतात अनेक वस्तुची


नागपूर– परवानगी एका वस्तुची पुरवठा मात्र, विविध वस्तुंचा. त्याच प्रमाणे परवानगी एका रेल्वे गाडीची पुरवठा विविध गाड्यात, अशी स्थिती रेल्वेत आहे. काही तर चक्क विना परवानगीच कच्चामाल पुरवठा करतात, विशेष म्हणचे त्या व्यक्तीची आणि त्यांच्याकडील पदार्थांची कधी तपासणी सुध्दा होत नाही. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार नागपूर रेल्वे स्थानकावर सुरू आहे. आरपीएफ, लोहमार्ग पोलिस आणि वाणिज्य विभागातील अधिकाèयांच्या डोळ्यादेखत या प्रकारामुळे कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

रेल्वे गाड्यात कच्चा माल पुरवठा करण्यासाठी अधिकृत एजंट नेमले जाते. नागपूर रेल्वे स्थानकावर अधिकृत एजंट पाच आहेत. त्यांच्या मार्फत रेल्वे गाड्यांती पेंट्रीकारला भोजनासाठी लागणारा कच्चा मालाचा पुरवठा करतात. ते अधिकृत असल्याने त्यांनी पुरवठा केलेल्या कच्च्या मालाची कधी तपासणी सुध्दा होत नाही. तसा प्रश्नही पडत नाही. याच संधीचा फायदा घेत पेंट्रीकार मधील कर्मचारी आणि अधिकृत एजंट यांच्यात साठगाठ असल्याने मद्य पुरवठा करणाèयांची धरपकड करण्यात आली होती.

कोणी किती गाड्यांना कच्चा माल पुरवठा करावा यासाठी अधिकृत परवानाधारकांना दिलेल्या पत्रावरच असते. एका वेंडरला जास्तीत जास्त तीन चार गाड्यांना कच्चा माल पुरवठा करण्याची परवानगी असते. मात्र, त्या परवागीच्या आधारे विविध गाड्यातील पेंट्रीकार व्यवस्थापकांशी हातमिळवणी करीत कच्चा माल पुरवठा करतात. अशा अधिकृत एजंट विरूध्द कारवाई करण्याचे रेल्वेच्या वाणिज्य विभागाने अद्यापर्यंत कोणतेही धाडस दाखविले नाही. विशेष म्हणजे या एजंटमुळे रेल्वेला काही महसूल मिळत नाही. रेल्वेनी अशा एजंटकडून महसूल घ्यावा. त्यांच्या खाद्य पदार्थाची तपासणी करून देखरेख करावी, अशी मागणी केली जात आहे.


अनाधिकृत एजंटवर कोणाचा आशिर्वाद
कच्चा माल पुरवठा करणाèया अधिकृत वेंडरसोबतच एक विनापरवाधारक वेंडर रेल्वेस्थानकावरील रेल्वे गाड्यांना राजरोसपणे मालाचा पुरवाठा करीत असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली आहे. सध्या कोरोनाच्या संकटकाळात प्रवासी रेल्वे गाड्या कमी प्रमाणात असल्या तरी विनापरवागी वेंडर राजधानी गाड्यांना आईस्क्रिम आणि दही पुरवठा करीत आहे. परवानगी नसताना रेल्वेस्थानकात शिरतोच कसा? मालाचा पुरठवा करतोच कसा असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित होत आहे. रेल्वेचा वाणिज्य विभाग, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी याकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे काय?असाही प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित होत आहे.

वाणिज्य विभागाला अधिकार
रेल्वेकडून अधिकृत वेंडर नेमले आहेत. वाणिज्य विभागाला परवाना देण्याचे अधिकार आहेत. त्यांनी किती गाड्यांना पुरवठा करावा. कोण कोणता कच्चा माल पुरवठा करावा, याविषयी त्यांना दिलेल्या परवान्यावरच लिहले असते. मात्र, नियमांना केराची टोपली दाखवित सर्रास कच्चा माल पुरवठा केला जातो. हेवेंडर कच्चा माल कुठून आणतात. त्या मालाची तपासणी सुध्दा करण्याचे अधिकार वाणिज्य विभागाला आहेत. सध्या प्रवासी गाड्या कमी असताना अशी स्थिती आहे. पूर्ण क्षमतेने गाड्या चालल्यास काय होईल?