Published On : Wed, Aug 19th, 2020

भोसले राजाच्या तान्ह्या पोळ्याला 214 वर्षे पूर्ण; 8 फूट उंच आणि 6 फूट लांब लाकडी बैलासह निघते मिरवणूक

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरु आहे. यावर्षी लाकडी बैलांच्या ( तान्हा ) पोळ्याला २१४ वर्ष पूर्ण होत आहेत.

विदर्भ वगळता कुठेच हा पोळा साजरा केला जात नाही. १८०६ मध्ये श्रीमंत राजे रघुजीराव महाराज भोसले यांनी हा उत्सव सुरु केला. लहान बालगोपालांना बैलाचे महत्व कळावे. म्हणून त्यांनी लाकडी बैल (तान्हा) पोळ्याची सुरुवात केली. श्रीमंत राजे रघुजीराव महाराज भोंसले यांनी लाकडी बैल तयार करून मागविले व सर्व लहान मुलांना ते वाटण्यात आले. सजीव बैलांप्रमाणे लाकडी बैलांना सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून त्याला जिलबी, फळं, आता चॉकलेट, बिस्किट पुडे, अशा विविध वस्तूंनी तयार केलेले तोरण बांधून त्यामध्ये मुलांना उभे करून बैलांची पूजा करण्यात येत असे.

Advertisement

पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे,वाटण्यात यायचे. या प्रथेला २१४ वर्षे पूर्ण होत आहे. श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली आहे. श्रीमंत राजे रघुजीराव महाराज भोंसले वाजत गाजत मिरवणूक काढायचे त्याच परंपरेला अनुसरून मिरवणूक काढली जाते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे उत्सवी मिरवणूक टाळण्यात आली.

सर्वात मोठा लाकडी बैल

भोसलेंच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. मुधोजी_राजेंचे निवासस्थान सीनियर भोसला पॅलेस, महाल, नागपूर येथे हा बैल बघता येईल. या लाकडी बैलांची उंची आठ फूट व लांबी सहा फूट असून या बैलाच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे. वाड्यातील सागवान लाकडांपासून दोन भागात तयार करण्यात येऊन नंतर बैल जोडण्यात आल्याची माहिती राजे जयसिंग भोसले यांनी दिली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement