Published On : Fri, Oct 6th, 2017

ICAI प्रेसिडेंटच्या मुलीचा मृतदेह सापडला रेल्वे ट्रॅकवर

Advertisement


मुंबई: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) चे अध्यक्ष निलेश विकमसे यांची मुलगी पल्लवीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला आहे. ही घटना बुधवारी रात्रीची आहे. गुरुवारी पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. पल्लवीने मृत्यूपूर्वी एक मेसेज कुटुंबियांना पाठवला होता. त्यात माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर तिचा फोन बंद झाला होता. पोलिस या प्रकरणाचा आत्महत्या की हत्या या दोन्ही अँगलने तपास करत आहे.

कायद्याचे शिक्षण घेतले होते पल्लवीने
पल्लवी (21) प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट फर्म खीमजी कुंवरजी अँड कंपनीचे पार्टनर निलेश विकमसे यांची सर्वात छोटी मुलगी होती. निलेश 35 वर्षांपासून आयसीएआयचे सदस्य आहेत.

पल्लवीने कायद्याचे शिक्षण घेतलेले होते. ती इंटर्नशिप करत होती. बुधवारी सायंकाळी 6 वाजता पल्लवी ऑफिसमधून घरी येण्यासाठी निघाली. ती सीएसटी स्टेशनवरुन लोकलने घराकडे निघाली होती. तोपर्यंत तिचा मोबाइल सुरु होता. पल्लवी उशिरा रात्रीपर्यंत घरी आली नाही तेव्हा कुटुंबियांनी तिच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क केला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement