Advertisement
आपल्या कामाच्या पद्धतीमुळे कायम चर्चेत आणि त्याहून जास्त वेळा वादात असणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे यांची अखेर पुन्हा एकदा बदली झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक असलेल्या मुंढेंची आता नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
महाविकासआघाडीचं नवीन सरकार आल्यानंतर सरकारने भाजपचा गड असलेल्या नागपूरमध्ये तुकाराम मुंढेंसारख्या शिस्तप्रिय आणि कडक अधिकाऱ्याची बदली केल्यामुळे भाजपसाठी ही अडचणीची बाब ठरणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याआधी नाशिकचे आयुक्त असताना तुकाराम मुंढेंच्या कारभाराला कंटाळून तिथल्या लोकप्रतिनिधिंनी त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याआधी पिंपरी-चिंचवड आणि बीडचे आयुक्त असताना देखील त्यांच्या कडक शिस्तीचा फटका लोकप्रतिनिधींना बसला होता.