Published On : Wed, Feb 12th, 2020

बेरोजगारांच्या न्यायिक मागण्यासाठी ‘ प्रहार’ चा अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

Advertisement

मागण्या मान्य न झाल्यास छत्रपती शिवाजी जयंती दिनापासून अन्नत्याग आंदोलन

कामठी :-कामठी तालुक्यातील वडोदा गुमथळा अंतर्गत विविध खाजगी कंपन्या असून या कंपणोत कार्यरत असलेले कर्मचारी हे बहुतांश बाहेर राज्यातील असून त्यांना कायदेशीर पाहिजे तश्या कुठलाही सोयी सुविधांचा लाभ मिळत नाही त्यातही कार्यरत मजुरांना नाईलाजाने बारा तास काम करावे लागत आहे तेव्हा या मजुरांना कायदेशोर सोयी सुविधांचा लाभ मिळवून देण्यासह तालुक्यातील स्थानिक बेरोजगारांना या कंपनीत रोजगाराची संधी देण्यात यावी या मागणीसह कंपनीच्या हिटलरशाही धोरणा विरुद्ध प्रहार जनशक्ती पक्ष चे कामठी विधानसभा प्रमुख छत्रपाल करडभाजने यांच्या वतीने अप्पर कामगार आयुक्त नागपूर ला दोनदा सामूहिक निवेदन सादर करण्यात आले मात्र या मागणीला केराची टोपली दाखवीत असल्याने न्यायिक मागण्या 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण न झाल्यास आगामी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनापासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुमथळा येथील हल्दीराम कंपणी समोर तळ ठोकून अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशारा प्रहार चे छत्रपाल करडभाजने यांनी अप्पर कामगार आयुक्त ला दिलेल्या निवेदनातून करन्यात आला.

कामठी तालुक्यातील वडोदा-गुमथळा जी प सर्कल मध्ये स्वेता पेपर मिल, लक्ष्मी गोविंद पेपर मिल, काबरा ए प्रा लो, उत्तम प्लायवूड प्रा ली, सालासार ऍग्रो प्रा ली, लिपी इंटरनॅशनल प्रा ली, वडोदा,हल्दीराम फ्रुटस प्रा ली गुमथळा, सालासार पेपर मिल प्रा ली सेलू, यासारख्या विविध कंपन्या कार्यरत असून बहुधा परराज्यातील कामगार कार्यरत आहेत तर तालुक्यात स्थानिक बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे तेव्हा या कंपनीत ठेकेदार पद्ध्ती बंद करून थेट कंपनी मार्फत कामगार भरती करण्यात यावे, कामगारांचे 12 तास ऐवजी 8 तास करण्यात यावे, कायद्यानुसार किमान वेतन देण्यात यावे, भविषय निर्वाह निधि कपात करण्यात यावे, वैद्यकीय सोयी सुविधा लागू करण्यात याव्या, तसेच स्थानिक बेरोजगारांना 80 टक्के रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे

या मागण्या करण्यात आल्या आहेत मात्र यामागण्या पूर्ण न करता मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष पुरविण्यात येत आहे तेव्हा यामागण्या 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण न केल्यास अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून करण्यात आला आहे. याप्रसंगी छत्रपाल करडभाजने , प्रहार कामगार संघटनेचे जिल्हा प्रमुख मनोज अतकरी, प्रहार शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष पंकज ढोरे, अरविंद पाटील, महेश अटारकर, वृषभ अटारकर, वृषभ झाळे, कार्तिक भिशेकर, अनिल वंजारी, आदी उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी