Published On : Sun, May 31st, 2020

५० वर्षा निमित्त सीटूच्या स्थापनेला आशा वर्कर्स तर्फे मानव श्रृंखला

नागपुर: सी.आय.टी.यू. स्थापने च्या निमित्ताने विविध ठिकाणी मागण्यांचे फलक घेऊन आशा वर्कर्स, गटप्रवर्तक व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मानव श्रृंखला करून आंदोलन करून वर्षगाठ साजरी केली. सिटूच्या स्थापनेला जवळजवळ आज पन्नास वर्षे झालेत कलकत्ता येथील 3O मे 1970 रोजी स्थापना झाली.

आंदोलनाचे नेतृत्व युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे, महासचिव प्रीती मेश्राम व सचिव रंजना पौनिकर यांनी केले. कार्यक्रमात सोशल डीस्टसं च्या नियमाचे पालन करण्यात आले असून आशा, गटप्रवर्तक व कंत्राटी कामगारांना शासकीय कर्मचारी घोषित करा, समान काम -समान वेतन पद्धती लागू करा, ए पी एल / बी पी एल अट रद्द करा, लॉकडाऊन दरम्यान सर्व कामगारांना किमान ७५०० रुपये महिना द्या. या मागण्याचे फलक घेऊन निदर्शने केली.

समापन करतांना अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी संबोधित करतांना संघर्ष केल्याशिवाय मार्ग नाही, पुंजिवादी धार्जिणे सरकारला उलथून पाडण्याकरिता कामगारांनी सीटू चे नेतृत्वात एकजुटीचा परिचय देऊन मोठ्या संघर्षा करिता सदैव तयार राहण्याचे आवाहन केले. तरीसुद्धा सरकारला जाग आली नाही या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशा वर्करांनी आपला जीव धोक्यात टाकून आपल्या भारत देशासाठी आपल्या कर्तव्याचे पालन केले.

तरीसुद्धा आशांच्या मागण्या मान्य केल्या नाही. वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. आज सिटूला 50 वर्षे झाली. या कार्यक्रमाला प्रामुख्याने पौर्णिमा पाटील, अंजु चोपडे, रुपलता बोंबले, नासिर खान, अरुणा शेंडे, नंदा लिखार, लक्ष्मी कोटेजवार, मंजुषा फटींग, रिया रेवतकर ईत्यादी कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील ४८ ठिकाणी कार्यक्रम घेऊन सीटूच्या झेंड्याला मानवंदना दिली.