कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत कार्यरत कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याशी असभ्य वागणूक करुन त्यांच्या अंगावर धावून जाऊन मारहाण कॉलर पकडल्याचो घटना नुकतीच काही दिवसांपूर्वी घडल्याचा घटनेला विराम मिळत नाही तोच काल जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील शुक्रवारी बाजारात कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावत जाऊन त्याची कॉलर पकडून अश्लील शिवीगाळ देत अपमानास्पद वागणूक केल्याची घटना काल सायंकाळी 6 दरम्यान घडली असून यासंदर्भात अपमानास्पद वागणूक झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव निशांत कांबळे वय 32 वर्षे रा खलाशी लाईन कामठी असे आहे.तर यासंदर्भात दोन आरोपिवर गुन्हा नोंदवीत आला असून यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास सुचनापत्र देऊन सोडण्यात आले. तर अटक आरोपीचे नाव यासीन शेख युसूफ शेख वय 22 वर्षे रा कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाउन नुसार गर्दीवर नियंत्रण साधण्यासाठी काल शुक्रवार आठवडी बाजाराच्या दिवशी सायंकाळी 6 दरम्यान लोकसेवक असलेले पोलीस शिपाई निशांत कांबळे व आफाक अन्सारी हे बिट मार्शल म्हनून कर्तव्य बजावत असताना शुक्रवारी बाजारातील मांसाराम शाळेजवळील रोडवर एक तरुण परवानगी नसलेल्या जागेवर फळांचा ठेला लावून , कुठलाही मास्क न लावता ग्राहकांची गर्दी लावून फळ विक्री करोत असता सदर आरोपीला एसीपी बन्सोड यांनी 17 मे ला लागू केलेल्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे सांगून कारवाही करण्याच्या बेतातून त्याचा दुकानातील वजन करणारे तराजू काटा उचलला असता सदर आरोपी ने या बिट मार्शल शी अपमानास्पद वागणूक करीत त्याच्या अंगावर धावून जात त्याची कॉलर पकडली यावर सदर वर्तनूकीतून आरोपीला पोलीस स्टेशन ला घेऊन जात असता दुसरा आरोपी यासीन शेख युसूफ शेख ने त्वरित धावा घेऊन सदर पोलिसांच्या हाताला झटका मारून त्यांच्या स्वाधिन असलेल्या आरोपिला बळजबरीने सोडवून तुम पोलीसवालो ने धंदा खराब करके रखा है
असे शाब्दिक वक्तव्य करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला यावर फिर्यादी पोलीस कर्मचारी निशांत कांबळे ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून सदर दोन्ही आरोपी विरुद्ध भादवी कलम 353, 294, 188, 34 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.