नागपूर : हुडकेश्वर पोलिसांनी वाहन चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. एका सराईत आरोपीसह विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी तब्बल पाच गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपींकडून चोरीच्या तीन दुचाकी, सोन्याचे दागिने आणि इतर साहित्य असा एकूण 1 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मे रोजी तरोडी खुर्द येथील रहिवासी लंकेश नेवारे यांनी त्यांच्या भावाची दुचाकी गजानन मंदिरासमोरून चोरी झाल्याची तक्रार हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. 1 जून रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन युवक नरसाळा गावातील पाण्याच्या टाकीजवळ चोरीची दुचाकी विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी सापळा रचून शोहेब उर्फ शोभू असलम खान आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान दोघांनी वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्यांचा तीन वाहन चोरी, एक घरफोडी आणि एक जबरी चोरी अशा एकूण पाच गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींच्या निशाणदेहीवरून पोलिसांनी चोरीच्या तीन दुचाकींसह सोन्याचे दागिने आणि इतर साहित्य जप्त केले. या कारवाईत एकूण 1 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews...
प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी...
वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha...
नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday...
वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra
संजय राउत ने पुलिस कार्रवाई पर सवाल उठाए #maharashtranews #delhi #vidarbhanews #nagpurnews...





