
नागपूर -हुडकेश्वर पोलीस ठाण्यातून एका कुख्यात चोरीच्या आरोपीने पोलिसांना चकवा देत पलायन केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकारामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून फरार आरोपीच्या शोधासाठी शहर पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. तीन दिवसांपूर्वीच चोरीच्या गुन्ह्यात या आरोपीला अटक करण्यात आली होती.
पोलीस कोठडीत असलेल्या फरार आरोपीची ओळख २५ वर्षीय इक्का उर्फ हर्ष महेंद्र रामटेके, रा. तिरोडा अशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ८ वाजता पोलिसांनी आरोपीला शौचालयासाठी कोठडीतून बाहेर काढून पोलीस ठाण्यातील दुसऱ्या स्वच्छतागृहात नेले होते. याचवेळी संधी साधत आरोपीने पोलिसांना चकवा दिला आणि तेथून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने पोलीस ठाण्यात दाखल झाले. आरोपीच्या शोधासाठी शहरातील विविध ठिकाणी विशेष पथके रवाना करण्यात आली असून संभाव्य ठिकाणांवर शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान, पोलीस कोठडीतून आरोपी पसार झाल्याने पोलीस सुरक्षा व्यवस्थेवर आणि निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. फरार आरोपीला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी हुडकेश्वर पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
महाबलेश्वर में 3000mm पार बारिश! #Mahabaleshwar #Monsoon #HeavyRain #RainUpdate #MaharashtraNews
पहली बार सावंतवाड़ी में रुकी मंगलूरू एक्सप्रेस! #Express #Sindhudurg #TrainNews #RailwayNews #news
मंदिर प्रबंधन धर्माचार्यों को सौंपने की मांग #NarendraAcharya #RamMandir #Ratnagiri #EducationNews
प्रेम संबंध के विवाद में हुआ था खूनी संघर्ष #NagpurCrime #Crime #Police...
अदरक के दाम गिरने से किसान परेशान #maharashtranews #newsupdate #kisan #latestnews
हेलमेट अभियान के बीच उठे नए सवाल




