Published On : Mon, Jul 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

E20 इंधनावरील पोस्टप्रकरणी नितीन गडकरींना दिलासा; आक्षेपार्ह कंटेंटविरोधात कारवाईला न्यायालयाची मंजुरी

Advertisement

नवी दिल्ली : E20 इंधनाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. E20 इंधनासंदर्भात त्यांच्याविरोधात बदनामी करणाऱ्या, चुकीची माहिती पसरवणाऱ्या किंवा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोल अर्थात पेट्रोलमध्ये २० टक्के एथेनॉल मिश्रणाच्या धोरणावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या धोरणाला विरोध करणाऱ्या अनेक ऑनलाइन मोहिमा आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काही जणांकडून E20 इंधनामुळे वाहनांचे इंजिन, मायलेज आणि कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे दावे केले जात आहेत.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रसारित होणाऱ्या बदनामीकारक मजकुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदेशीर पावले उचलण्याची परवानगी दिली आहे.

सोशल मीडिया कंपन्यांवरही लक्ष
न्यायालयाच्या निर्देशांनुसार, आक्षेपार्ह किंवा चुकीची माहिती पसरवणाऱ्या पोस्टविरोधात सोशल मीडिया कंपन्यांकडूनही आवश्यक ती कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये मेटा, गुगल आणि एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या दिशाभूल करणाऱ्या कंटेंटचाही समावेश आहे.

Advertisement

E20 धोरणावरून सुरू आहे वाद-
E20 इंधन लागू करण्याच्या निर्णयावरून वाहनधारक आणि काही संघटनांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या इंधनामुळे गाड्यांचे मायलेज कमी होणे, इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणे अशा विविध दावे सोशल मीडियावर करण्यात येत आहेत. याच मुद्द्यावरून नितीन गडकरी यांच्यावरही टीका होत असून, काही ठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यात आली होती.

दरम्यान, सरकारकडून E20 इंधनाचे पर्यावरणीय आणि आयात खर्च कमी करण्याच्या दृष्टीने फायदे सांगितले जात आहेत, तर विरोधकांकडून वाहनधारकांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टीका करा, पण चुकीची माहिती पसरवू नका-
न्यायालयाच्या निर्णयानंतर E20 इंधनाबाबत सोशल मीडियावर व्यक्त होताना तथ्यांची पडताळणी करणे आवश्यक ठरणार आहे. धोरणावर टीका करण्याचा अधिकार असला तरी, कोणत्याही व्यक्तीविरोधात खोटा किंवा बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.

Advertisement
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews #newsupdate #mobile

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray  #nagpurnews #news #shivsenaubt

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...

सात किलो गांजा, तीन आरोपी गिरफ्तार

सात किलो गांजा, तीन आरोपी गिरफ्तार

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges