Published On : Thu, Jun 7th, 2018

मातोश्रीवर शहा-उध्दव भेटीत शिवसेनेची किंमत किती ठरली – नवाब मलिक

मुंबई: शिवसेनेचे उध्दव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मातोश्री भेटीमध्ये शिवसेनेची किंमत ठरली का याचं उत्तर महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेला हवे आहे .तशी माहिती भाजप-सेनेने जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे काल मुंबईमध्ये आले होते.त्यांनी उदयोजक रतन टाटा,माधुरी दिक्षित यांची भेट घेतली.शिवाय दिल्लीमध्ये शहा यांनी प्रतिष्ठितांची भेट घेतली.पक्षाने चार वर्षात काय काम केले याची माहिती ते देत आहेत. मुळात सरकारने शेतकरी,शेतमजुर कामगार यांच्याकडे लोखाजोखा सादर न करता मात्र ज्यांनी पक्षासाठी काम केले आहे त्यांच्याच भेटी ते घेत आहेत. आज तुम्ही लाखभर लोकांना भेटा परंतु ही करोडो जनता तुम्हाला बाहेरच फेकणार आहे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

शिवसेनेकडून वारंवार सांगितले जाते की,आम्हाला मोदी,देवेंद्र आणि सरकार किंमत देत नाही.साडेतीन वर्ष किंमत देत नाही,किंमत देत नाही अशी ओरड मारत आहात मग आत्ता शहा आणि उध्दव ठाकरे यांच्या दिड तासाच्या भेटीमध्ये शिवसेनेची किंमत ठरली का? असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.