Published On : Tue, Mar 6th, 2018

मेट्रोच्या निर्माणधीन कामामुळे अजून किती लोकांचे बळी जाणार ? युवक काँग्रेस चे तीव्र आंदोलन

Advertisement


नागपूर:अखिल भारतीय युवक काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात पूर्व नागपूर युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष अक्षय घाटोळे यांच्या नेतृत्वात टेलिफोन एक्सचेंज चौक येथे मेट्रो रेल्वे च्या विरोधात तीव्र आंदोलन केले. पार्श्वभूमी अशी की मेट्रो रेल मुळे जिकडे-तिकडे वाहतुकीची कोंडी होत आहे. ना मेट्रोचे कर्मचारी तैनात असतात ना वाहतूक पोलीस मेट्रो रेल च्या गलथान कामामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले.

मागे वर्धमान नगर येथे गडर पडले तेव्हा एका परिवारातील ४ सदस्य गंभीर जखमी झाले युवक काँग्रेसने तेव्हा सर्वपक्षीय आंदोलन केले होते.तेव्हा त्या परिवाराला आर्थिक मदत दिली होती. तसेच बर्डी येथे विशाल पिल्लर कोसळला त्याच प्रमाणे असे नेहमी छोटे मोठे अपघात मेट्रोच्या कामामुळे होतच राहाते. पण काल मेट्रो रेल च्या निर्माणधीन कामामुळे सुरक्षाकर्मी नसल्यामुळे व वाहतूक नियंत्रण नसल्यामुळे एका ट्रक ने दुचाकी वाहनाला धडक दिली. त्यात मंगला धोटे नामक महिलेचा मृत्यू झाला व त्यांच्या पतीला गंभीर दुखापत झाली याला सर्वस्वी मेट्रो प्रशासन जबाबदार आहे.

मेट्रो रेल च्या अधिकारयांना युवक काँग्रेस चेतावणी देत आहे की कुंभकर्णी निद्रेतून जागे व्हा नाही तर युवक काँग्रेस नागपूर शहरातील मेट्रोचे काम बंद पाडेल. असा ईशारा युवक काँग्रेसने दिला. आजच्या आंदोलनात अंकित गुंमगावकर,स्वप्नील ढोके,सागर नबीरा,शुभम खुराणा,बाबू खान, पियुष खडगी,वसीम शेख, राहुल मोहोड, फजळूर कुरेशी,सौरभ शेळके, निखिल चनेकर, इरफान शेख, मयूर खोडे, मयूर नागपुरे, हर्षल घोंगे, वरून पुरोहित, निखिल नंदनवार,योगेश चौरसीयां, प्रीतम वैरागडे, नितीन गुरव, अंकित पवार, प्रेम गायकवाड, रुपेश चोरागडे, निखिल बालखोटे, पंकेश निमजे, सागर चव्हाण, आशिष लोणारकर, विजय मिश्रा, पूजक मदने, नितीन सुरुशे,रोशन पंचबुद्धे, रुपेश धांडे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.