Published On : Thu, Jul 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या हेरिटेज हॉटेलच्या ‘हाऊस ऑफ बिअर’वर सीलची कारवाई; हुक्का प्रकरणात मोठा दणका

Advertisement

नागपूर :व्हीसीए स्टेडियम परिसरातील हेरिटेज हॉटेलमधील ‘हाऊस ऑफ बिअर’ या कॅफेमध्ये बेकायदेशीररित्या हुक्का सेवा सुरू असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी संबंधित आस्थापनावर सीलची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत असून, लवकरच अंतिम कारवाई होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी सदर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने कॅफेवर छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान अनेक ग्राहक हुक्का सेवन करताना आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून ग्राहकांसह कॅफे व्यवस्थापनाविरुद्ध कायदेशीर कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल केला. तपासात प्रतिबंधित तंबाखूजन्य फ्लेवर ग्राहकांना पुरविल्याचेही समोर आले.

पोलिसांनी कॅफे मालकाला नोटीस बजावत, आस्थापनावर सीलची कारवाई का करू नये याबाबत खुलासा मागविला होता. मात्र, निर्धारित मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सील करण्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.

या संदर्भात परिमंडळ क्रमांक २च्या पोलिस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह यांनी कागदोपत्री प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

Advertisement

दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर हुक्का पार्लर चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. ‘हाऊस ऑफ बिअर’वर सीलची कारवाई झाल्यास चोरीछुपे सुरू असलेल्या इतर हुक्का पार्लरवरही पोलिसांचा धाक निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.