Published On : Thu, Jul 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मराठवाडा पुन्हा हादरला; सलग भूकंपाचे धक्के, नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली

Advertisement

हिंगोली -मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा भूकंपाच्या सलग धक्क्यांनी नागरिकांची झोप उडवली. मध्यरात्रीनंतर काही मिनिटांच्या अंतराने आलेल्या तीन ते चार धक्क्यांमुळे अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले. हिंगोली शहरासह वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ परिसरात हे हादरे तीव्रतेने जाणवले. अवघ्या आठवडाभरापूर्वीही या भागात भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पांग्रा शिंदे व काकडधाबा परिसर केंद्रस्थानी-
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) आणि स्थानिक यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला मोठा धक्का पहाटे 1.37 वाजता बसला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.6 इतकी नोंदविण्यात आली. वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे गावाजवळ जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोलीवर त्याचा केंद्रबिंदू होता. हा धक्का बसण्यापूर्वी भूगर्भातून मोठा आवाज ऐकू आल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले.

Gold Rate
July 13 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,800 /-
Gold 22 KT ₹ 1,32,500 /-
Silver/Kg ₹ 2,19,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानंतर पहाटे 2.15 वाजता 3.6 रिश्टर स्केलचा आणि अवघ्या दोन मिनिटांनी 2.17 वाजता 3.9 रिश्टर स्केलचा आणखी एक धक्का जाणवला. या दोन्ही धक्क्यांचा केंद्रबिंदू काकडधाबा गावाजवळ होता. त्यानंतर पहाटे 3.23 वाजताही सौम्य भूकंपाची नोंद झाली.

गावागावांत सतर्कतेचा इशारा-
अचानक झालेल्या हादऱ्यांमुळे नागरिकांनी घाईघाईने घराबाहेर धाव घेतली. अनेक गावांमध्ये मंदिरांवरील ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले. लहान मुले, महिला आणि वृद्धांना घेऊन अनेक कुटुंबांनी रात्रभर मोकळ्या जागेतच थांबणे पसंत केले.

Advertisement

याआधी 2 जुलै रोजीही हिंगोली जिल्ह्यात अवघ्या दहा तासांच्या अंतराने दोन भूकंप झाले होते. त्यानंतर पुन्हा सलग धक्के बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात जमिनीतील हालचाली आणि भूगर्भातील दाबातील बदल यामुळे या भागात वारंवार सौम्य ते मध्यम तीव्रतेचे भूकंप जाणवत आहेत.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

गर्लफ्रेंड को घुमाने के लिए बना बाइक चोर, आरोपी गिरफ्तार ...#nagpurnews

गर्लफ्रेंड को घुमाने के लिए बना बाइक चोर, आरोपी गिरफ्तार ...#nagpurnews

सेवानिवृत्त उप जिलाधिकारी के घर में हुई चोरी का खुलासा #NagpurNews #CrimeNews #theft #CrimeBranch

सेवानिवृत्त उप जिलाधिकारी के घर में हुई चोरी का खुलासा #NagpurNews #CrimeNews...

गौरक्षण आश्रम के बाहर खड़ी कार का कांच तोड़कर चोरी ...#maharashtranews #vidarbhanews #nagpurnews

गौरक्षण आश्रम के बाहर खड़ी कार का कांच तोड़कर चोरी ...#maharashtranews #vidarbhanews...

इथेनॉल विवाद पर बढ़ा सियासी संग्राम #nagpurnews #ethenol #nitingadkari #bjp #cybercrime #latestnews

इथेनॉल विवाद पर बढ़ा सियासी संग्राम #nagpurnews #ethenol #nitingadkari #bjp #cybercrime #latestnews

स्मार्ट मीटर मुद्दे पर शिवसेना का ज्ञापन ... #maharashtranews #vidarbhanews #nagpurnews #newsupdate

स्मार्ट मीटर मुद्दे पर शिवसेना का ज्ञापन ... #maharashtranews #vidarbhanews #nagpurnews #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges