Published On : Wed, Aug 30th, 2017

संततधार पावसाने घराची झाली पडझड


वाडी(अंबाझरी):
खडगांव मार्गावरील लाव्हा ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या सोनबानगर परिसरात नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे तीन घरे पडल्याने आर्थिक नुकसान झाले व सदर गरीब परिवार अडचणीत आल्याने त्रस्त परिवाराला शासनाने तातडीने मदत करावी अशा प्रकाराची मागणी नागपूर ग्रामीण चे तहसीलदार यांचे कडे पस उपसभापती सुतित नितनवरे यांनी केली आहे.

प्राप्त माहिती नुसार सोनबानगर निवासी गीता तुमडाम, उज्वला दुपारे. रंजना कामळी या गरीब नागरीकांचे घरे या जोरदार पावसाने पडल्याने त्यांच्या घरात पाणी शिरून सर्व जीवनावश्यक वसूची नासधूस झाली, ही माहिती मिळताच पस उपसभापती सुजित नितनवरे हे आपले सहकारी ग्रामविकास अधिकारी विकास लाडे, पटवारी तभाने घटनास्थळी पोहचले त्यांनी घटनेची पाहणी केली व नुकसानीचा पंचनामा केला तसेच हा अहवाल तातडीने शासनाकडे पाठवून शासकीय सहायता मिळण्यासाठी पस चे खंड विकास अधिकारी, ग्रामीन तहसिलदार नागपूर यांच्याकडे कार्यवाहीसाठी अहवाल रवाना केला याप्रसंगी माजी सभापती मधूकर बर्वे, मोरेश्वर वरठी, विजय कडवे, रामकृष्ण धूर्वे, सुरेश देशमूख, अमृत टेंभरे, शोभा शेंडे शिला वानखेडे, चंद्रकांत रोकडे उपस्थित होते.