नागपूर : वाठोडा पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडीच्या दोन घटना घडल्या असून यामध्ये आरोपींनी टीव्ही, गॅस सिलेंडरसह 56 हजार रुपयांचा माल चोरून नेला होता.याप्रकरणी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाठोडा पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. शेख फिरोज उर्फ पक्या वालद शेख सत्तार आणि ऋषिकेश बडवाईक असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
तत्पूर्वी नवीन घरात टीव्ही लावण्यासाठी दोन घरात घरफोडी केल्याची कबुली आरोपींनी दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मालही जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाठोडा पोलिसांनी सुरु केला आहे.