Advertisement
नागपूर : शहारत चाकू घेऊन सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना रविवारी रात्री १.५० वाजताच्या सुमारास कामठी-कन्हान रोडवर चौधरी हॉस्पिटलजवळ सार्वजनिक ठिकाणी घडली.
विनय रामलाल मेश्राम (वय २२, रा. नागसेननगर, मोदी पडाव कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जुनी कामठी पोलिसांचे पथक रविवारी रात्री गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळला. पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तपासात पोलिसांना त्याच्याकडे लोखंडी चाकू आढळला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विनय विरुद्ध कलम ४/२५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.