Published On : Wed, Apr 4th, 2018

पश्चिम नागपुरात ‘हुक्का पार्लर्स’ जोरात, तरुणाई ‘धूम्रवलयांच्या’ विळख्यात

hookah

Representional Pic

नागपूर: राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी धूम्रपान आणि तंबाखू प्रतिबंधक कायदा २००३ मध्ये सरकारने नव्या सुधारणा देखील प्रस्तावित केल्या आहेत. परंतु तरीही नागपूर शहरात अजूनही अगदी राजरोसपणे हुक्का पार्लर सुरु आहेत. शहरात हुक्का पार्लर्सची सर्वाधिक संख्या मुख्यमंत्र्यांच्या पश्चिम नागपूर भागामध्ये आहे. त्यामुळे तरुणाई ध्रुमवलयांच्या विळख्यात सापडली आहे.

तंबाखू प्रतिबंधक कायद्यातील नव्या सुधारणा लागू करण्यासंबंधीचा आदेश (जीआर) स्थानिक प्रशासनाला प्राप्त झाला आहे अथवा नाही, हे जाणून घेण्यासाठी ‘नागपूर टुडेने’ जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याशी अनेकदा संपर्क साधला. परंतु ते फोनवर उपलब्ध झाले नाहीत. दरम्यान मंगळवारी यासंदर्भात नागपूरचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्याशी संपर्क केला असता आपल्याला याबद्दल काहीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु हुक्का पार्लरमुळे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेला उपद्रव निर्माण होत असून त्यामुळे नागपुरातील जनतेचा याला तीव्र विरोध असल्याचेही ते म्हणाले.

सोमवारीच अंबाझरी पोलिसांनी या भागातील ५ हुक्का पार्लरवर छापे घातले. यामध्ये अमरावती रोडवरील कोप्पा, थ्री बॅग्स, हवेली आणि लक्ष्मिभूवन चौकातील स्प्रेड आणि नाईन हुक्का पार्लरचा समावेश आहे. भरतनगरमधील एका अपार्टमेन्टमध्ये सुरु असलेल्या हवेली हुक्का पार्लरमध्ये छाप्यादरम्यान ९ किशोरवयीन मुले-मुली धूम्रवलये उडविताना आढळली होती. त्यांना सोमवारी रात्री उशीरा ताकीद देऊन सोडण्यात आले.

Advertisement

—Swapnil Bhogekar

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement