Published On : Wed, Aug 19th, 2020

उत्कृष्ट काम करणाऱ्या महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सत्कार

नागपूर: महावितरण मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नागपूर परिमंडलातील मुख्य तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व यंत्रचालक या तांत्रिक कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनी सत्कार करण्यात आला.

Advertisement

नागपूर प्रादेशिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक (प्रभारी) सुहास रंगारी होते. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके , महाव्यवस्थापक (विवले) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे,हरिष गजबे, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर,कुंदन भिसे,राजेश घाटोळे, राजेंद्र गिरी, बी. ए. हिवरकर उपस्थित होते .

Advertisement

यावेळी नागपूर शहर मंडल तील विविध कार्यालयात कार्यरत पिलाजी खंडाते,प्रकाश निकम,दुर्गादास भोस्कर,सुनील सेंगर ,दयाळ हनवते, चेतन तायवाडे,पुंडलिक थेटमाळी,गंगाधर आम्बोने, संजयकुमार चमेले व दिनेश कोवे या मुख्य व वरिष्ठ तंत्रज्ञाचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक कार्यालयात प्रातिनिधिक कार्य्रक्रम घेण्यात आला. नागपूर शहर, ग्रामीण आणि वर्धा मंडल कार्यालयातील एकूण ४८ कर्मचाऱ्याची यासाठी निवड करण्यात आली होती.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement