Published On : Thu, Nov 7th, 2019

बी के सी पी शाळा संचालका व्दारे सानिका मंगर चा गौरव सन्मान

कन्हान : – अखिल भारतीय मैदानी स्पर्धा नागौर राजस्थान येथील दौड स्पर्धेत कु सानिका मंगरने प्रथम क्रमांक प्राप्त करून दोन सुवर्ण व लांब उडीत रौप्य पदक पटकावित कन्हान शहराचे व बी के सी पी शाळेचे नावलौकिक केल्या बद्दल शाळा संचालक मा. राजीव सर खण्डेलवाल हयानी कु सानिका मंगरचा गौरव सन्मान करित आठ महिन्याची शालेय फी माफ केली.

नागौर राजस्थान येथे विद्या भारती अखिल भारतीय ३२ वी मैदानी स्पर्धेत संपुर्ण भारतातुन ११ श्रेत्राचे ७५० च्या अधिक खेडाळु सहभागी झाले होते.

राष्ट्रीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत बी के सी पी शाळा कन्हान ची इयत्ता १० वी ची विद्यार्थी खेडाळु कु.सानिका अनिल मंगर हीने पश्चिम श्रेत्राचे प्रतिनिधीत्व करित १७ वर्ष वयोगट मुलीं मध्ये १००, २०० मी. दौड (धावनी) स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून दोन सुवर्ण पदक पटकाविले.

तर लांब उडीत रौप्य पदक प्राप्त करित बीकेसीपी शाळेचे व कन्हान शहराचे नावलौकिक केल्याबद्दल शाळा संचालक मा. राजीव सर खण्डेलवाल हयानी गौरव सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छाने गौरव सन्मान करित तिची इयत्ता १० वी ची आठ महिन्याची शालेय फि माफ करून सत्कार करण्यात आला.

यावेळी क्रिडा शिक्षक अमित ठाकुर, मुख्याध्या पिका कविता नाथ, अभिजीत कौर बुटानी, विनय कुमार वैद्य सर प्रामुख्याने उपस्थित राहुन सर्वानी विद्यार्थीनी कु. सानिका मंंगर चे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.