Published On : Thu, Nov 7th, 2019

कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक येथे शेतमाल खरेदीस प्रारंभ

Advertisement

रामटेक: कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक येथे गेल्या 21 वर्षांपासून बाजार समितीच्या आवारात धान, सोयाबीन, गहू,चना,तूर,हिरवी मिरची, इतर शेतमाल तसेच कापूस खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असून याही वर्षी शेतमाल खरेदीला सुरुवात झालेली आहे.

समितीच्या रामटेक येथील आवारात व मंगळवारी देवळापार येथील उपबाजारात गुरांचा बाजार भरतो.धान्य बाजारात धानाची बोली दर सोमवार, बुधवार,शनिवारला व कडधान्य बोली दर रविवारी व गुरुवारी सकाळी 11 पासून सुरू राहील आणि भाजीपाला बाजार रामटेक येथे दर मंगळवार,बुधवार, गुरुवार,शनिवर आणि रविवारी राहत असून बाजार समितिला शुक्रवारी सुटी राहील.

शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल योग्य वजनमाप व नगदी चुकाऱ्याच्या हमीकरिता समितीच्या आवारात विक्रीकरिता आणावे तसेच व्यापारी बांधवांनी खेडेगावात जाऊन शेतमालाची अवैध खरेदी न करता समितीच्या आवारातच खरेदी विक्रीचे व्यवहार करून समितीला सहकार्य करावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक रवींद्र वसु व सचिव हनुमंता महाजन यांनी केले आहे.