Published On : Fri, Oct 11th, 2019

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व उघड्यावर लघवी करणा-या २३८४ जणांवर कारवाई

Advertisement

मनपा उपद्रव शोध पथकाची कामगिरी : मनपा मुख्यालय परिसरातही ११० जणांकडून दंड वसूल

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व उघड्यावर लघवी करणा-या २३८४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दहाही झोनमधील पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते १० ऑक्टोबर २०१९ दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सिव्‍हील लाईन्स येथील मनपा मुख्यालय परिसरातही उपद्रव शोध पथकाद्वारे उघड्यावर लघवी व थुंकणा-या ११० जणांवर कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला आहे.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे स्कॉड लिडर विरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करुन शहर विद्रुप करणा-यांवर कारवाई करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे उपद्रव शोध पथक तैनात करण्यात आले आहे. झोन स्तरावर पथकाची नेमणूक करण्यात आली असून पथकामध्ये ८७ जणांचा समावेश आहे.

उपद्रव शोध पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते १० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या १०५२ जणांवर कारवाई करुन ९५ हजार ८०० रुपये दंड वसूल केला तर उघड्यावर लघवी करणा-या १३३२ जणांकडून २ लाख ९ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दोन्ही कारवाईमध्ये एकूण २३८४ जणांकडून ३ लाख ५ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

हनुमान नगर, लक्ष्मीनगर व गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक कारवाई

उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबत सर्वाधिक कारवाई हनुमान नगर झोनमध्ये तर उघड्यावर लघवी करण्याबाबत लक्ष्मीनगर व गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. हनुमान नगर झोनमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या सर्वाधिक २८९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यापाठोपाठ लक्ष्मीनगर झोनमध्ये १५९, गांधीबाग झोनमध्ये ११७, धरमपेठ झोनमधील ११५, आसीनगर झोनमध्ये ९५, लकडगंज झोनमधील ९१, धंतोली झोनमध्ये ८७, मंगळवारी झोनमधील ६२, नेहरु नगर झोनमधील २७ व सतरंजीपुरा झोनमधील १० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

लक्ष्मीनगर व गांधीबाग झोनमध्ये उघड्यावर लघवी करणा-या प्रत्येकी २५५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या पाठोपाठ धंतोली झोनमध्ये २१०, मंगळवारी झोनमध्ये १४९, धरमपेठ व लकडगंज झोनमध्ये प्रत्येकी ११४, आसीनगर झोनमध्ये १०८, हनुमान नगर झोनमध्ये ७१, नेहरू नगर झोनमध्ये ४५ व सतरंजीपुरा झोनमध्ये ११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. झोनस्तरावर तैनात उपद्रव शोध पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

नागपूर शहर संपूर्ण देशात सुंदर शहर म्हणून ख्यातीप्राप्त होत आहे. आपले शहर हिरवे, सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यात नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याकडून कुठलाही उपद्रव होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी आणि असे काही आढळल्यास त्वरित महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथक किंवा स्वच्छता विभागाकडे माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement