नागपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची लेक शिवानी वडेट्टीवार यांच्या पदरी निराशाच पडली.अखेर काँग्रेसच्या केंद्रीय समितीने धानोरकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
प्रतिभा धानोरकर या दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार आहेत.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार सुरू झालेला असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस उमेदवाराची घोषणा होत नव्हती.
वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याने कुणाल उमेदवारी द्यावी असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांना पडला होता. अखेर पक्षांतर्गत संघर्षाने टोक गाठलेले असताना रविवारी रात्री अधिकृतपणे धानोरकर यांच्या नावाची घोषणा झाल्याने हा पेच सुटला.