Published On : Mon, Oct 4th, 2021

सोनेगावात नागपूर कराराची होळी

बेला : जवळच्या सोनेगाव लोधी येथील विदर्भवाद्यांनी राष्ट्रीय महामार्गावर नागपूर कराराची होळी करून विदर्भाच्या मागणीच्या घोषणा दिल्या. नागपूर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष वसंतराव कांबळे बाबा कांबळे व इतर अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदर आंदोलन पार पडले.

28 सप्टेंबरला नागपुर करार झाला होता त्यावेळी तज्ञ समितीने वेगळ्या विदर्भा ची मागणी महाराष्ट्र शासनाकडे अधोरेखित केली होती.

परंतु महाराष्ट्रवादी नेत्यांनी ती आजतागायत पूर्ण केली नाही .त्यामुळे विदर्भा मागासला व अनेक समस्या निर्माण झाल्या त्यामुळे विदर्भ राज्य मागणीचे आंदोलनाने तेव्हापासून जोर धरला.