Published On : Mon, Oct 4th, 2021

‘ लोकजीवन ‘ चे चिमुकले , आनंदले !

Advertisement

बेला : कोरोना संकटामुळे दीड वर्षापासून बंद पडलेल्या शाळा अखेर काल पासून सुरू झाल्या . लोक जीवन विद्यालयात शाळेपासून दुरावलेले पाचवी ते सातवीचे चिमुकले आनंद व उत्साहात शाळेत सकाळी दाखल झाले . त्यांचेसाठी प्रवेशद्वारात रंगीबे रंगी रांगोळीने आकर्षक सजावट करण्यात आली होती

शाळेचे प्राचार्य दिलीप खरबडे यांचे मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार सकाळ पाळीचे कार्यवाह उपमुख्याध्यापक रवींद्र वानखेडे यांनी विद्यार्थ्यांचे पुष्प सुमनांनी स्वागत केले व शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी आरती मुलेवार, गणेश लांबट रेखा धोडरे ,उत्तरा चिकराम , वैभव झाडे ,मेश्राम ,जय देव वाडिवे ,नीलिमा मेंघरे , दुशीला गजभिये , अतुल बहादुरे, नंदू पुरी आदी शिक्षक व कर्मचारी प्रवेशद्वारात उपस्थित होते.

शासनाच्या मार्गदर्शक सूचना व कोरोना नियमांचे पालन करून शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे.त्यानुसार सकाळ पाळीतील पाच ते सात मधील अंदाजे 390 मुलांपैकी वर्गनिहाय 50 टक्के विद्यार्थी संख्येच्या बॅचेस पाडण्यात आल्या आहे.त्यांना वन डे अल्टरनेट नुसार शाळेत बोलावण्यात येईल .

असे उपमुख्याध्यापक यांनी यावेळी सांगितले.पटांगण, वर्गाची स्वच्छता ,सॅनिटायझर फवारणी ,मुख्य पट्टीचा वापर व अंतर भेदाचे पालनही होत असल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले त्यामुळे पालकांनीही मुलांना शाळेत पाठवण्यास सहमती दर्शविली आहे.यापूर्वी आठवी ,नववी ,दहावी व बारावीचे वर्ग येथे सुरू झाले आहेत .पालकांकडून हमीपत्र भरून घेण्याचे काम वेगाने सुरू आहे .त्यामुळे लवकरच अकरावीचे ही वर्ग येथे सुरू होतील असे पर्यवेक्षक प्रा.सुनील मुलेवार यांनी सांगितले.