Published On : Mon, Jul 22nd, 2019

हिवरा शाळेत ‘शालेय मंञिमंडळ’ स्तुत्य उपक्रम

Advertisement

रामटेक: विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण व व्यक्तिमत्त्व विकसित करण्यारा असा एक स्तूत्य उपक्रम तालुक्याच्या हिवरा हिवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत नुकतेच ‘शालेय मंञिमंडळ’ची स्थापना करण्यात आली.

त्यात मुख्यमंत्री – योगिता गिरडे, शिक्षण मंञी- वैष्णवी हिंगे,आरोग्य मंञी-हर्षाली नेवारे ,क्रीडा मंञी-कुंदन राऊत,बनवारी तांदुळकर, शालेय पोषण आहार मंञी-आदेश सोनवाणे,निखिल ढोले, शालेय परिपाठ मंञी-सानिया नेवारे,स्वच्छता मंञी-रंजना कुंभलकर,समिक्षा नेवारे ,पाणीपुरवठा मंञी-दुर्गा भोयर,अलिषा चौरे, अर्थ मंञी-काजल वरठी यांची निवड सर्वांनुमते करण्यात आली.

या प्रसंगी मुख्याध्यापिका राजश्री गायधने,राज्य पुरस्कृत शिक्षक सचिन चव्हाण, संध्या राऊत,रूपाली चटप, शालिक महाजन ,संगिता सोनटक्के आदी उपस्थित होते.

शालेय आयोजनात विद्यार्थी सहभाग, कामाची वाटणी, तसेच विद्यार्थ्यांना मंञिमंडळाचा उद्देश, कामाची माहिती व आपण इतरांपेक्षा कोणीतरी अधिक आहोत,ही भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. अशी माहिती ‘उपक्रमशील शाळा’चे प्रमुख तथा प्रयोगशील शिक्षक सचिन चव्हाण यांनी सांगितले .या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदू चव्हाण,केंद्र प्रमुख सुरेश धुर्वे यांनी शुभेच्छा दिल्या