Published On : Mon, Jul 22nd, 2019

शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यचे वितरण

शिक्षणासह क्रीडा,कला क्षेत्रातही सहभागी व्हा-समाजसेविका ज्योती कोल्हेपरा यांचे प्रतिपादन,अपुर्व ज्योती बहुउद्देशिय संस्थेचा स्त्युत्य उपक्रम

रामटेक : समाजातील गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी या हेतूने स्थानिक पुर्वज्योती बहुउद्देशिय संस्थेद्वारा श्रीराम प्राथमिक शाळा रामटेक येथे शालेय साहित्याचे वितरण करण्यांत आले.

शिक्षक हे देशाचे भावी आधारस्तंभ घडविण्याचे पवित्र कार्य करीत असून विद्यार्थ्यांनीही समरसतेने व मेहनत करून शैक्षणिक प्रगती साधावी तसेच शिक्षणासह क्रीडा व कला क्षेत्रातही सहभागी होवून यश संपादन करावे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे विचार प्रतिपादन केले.

शाळेचे मुख्याध्यापक जयदेव डडोरे यांनी समाजसेवक गोपी कोल्हेपरा तसेच समाजसेविका ज्योती कोल्हेपरा यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाला ठाकरे,झिंगरे,राठोड,मुर्‍हेकर,शिक्षिका हलमारे,नाटकर,मून,गोल्हर,चिमणककर या शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते.या कार्यक्रमाबद्धल श्रीराम संस्थेद्वारा विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येत असलेल्या स्तुत्य उपक्रमा बद्दल गोपी कोल्हेपरा व ज्योती कोल्हेपरा यांचे आभार मानण्यात आले.