Published On : Sat, Jun 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

हिंगण्यात सायबर फसवणूक;मोबाईल गेम डाउनलोड करताच खात्यातून ५१ हजार ९०० रुपये गायब

Advertisement

हिंगणा : घरातील लहान मुलांना मोबाईल देताना पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ५१ हजार ९०० रुपये ऑनलाइन फसवणुकीद्वारे लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे.

वाघधरा येथील ४४ वर्षीय अजय नारायण सहारे यांना मोबाईलवर “सिक्युरिटी अपग्रेड”च्या नावाने एक लिंक प्राप्त झाली होती. दरम्यान, त्यांच्या लहान मुलांनी मोबाईलमध्ये गेम डाउनलोड करताना या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर सायबर भामट्यांनी मोबाईलवर नियंत्रण मिळवत बँकिंगशी संबंधित माहिती हस्तगत केल्याचा आरोप आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अजय सहारे यांचे आयसीआयसीआय बँकेचे खाते मोबाईल क्रमांकाशी जोडलेले होते. सायबर गुन्हेगारांनी या माहितीचा गैरवापर करून खात्यातून ५१ हजार ९०० रुपयांची रक्कम काढून घेतली. खात्यातून पैसे वजा झाल्याचे संदेश आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

फसवणुकीची माहिती मिळताच अजय सहारे यांनी हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात सायबर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Advertisement

या घटनेच्या पार्श्वभूमीवर अनोळखी लिंक, अॅप किंवा संदेशांवर क्लिक न करण्याचे तसेच मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.