Published On : Sun, Aug 18th, 2019

हिंदी भाषिक समाजबांधवांनी भुजलीतून विणली स्नेहबंधनांची नाती

रामटेक नगरीत राखी व भुजली सण उत्सवात साजरा परंपरा जपण्यासाठी गावकरी ,राजकीय ,सामाजिक ,व्यापारी क्षेत्रातील मान्यवर हर्षोल्लासात एकत्र. आकर्षक झाकीने वेधले रामटेक वासियांचे लक्ष .

रामटेक: भुजलीया उत्सव समिती रामटेक द्वारा आयोजित श्री क्षेत्र रामटेक येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही रक्षाबंधन भूजलीया उत्सव रामटेक शहरात मोठया हर्षोल्लासात साजरा करण्यात आला .कहार , भोई ,लोधी ,किराड ,काती व ईतर सर्व परदेशी समाजबांधवानी भुजोलियाचा सण मोठया उत्साहात साजरा केला .कहार समाज ,कहारपूरा रामटेक वरुन भूजलीया यात्रा निघाली .आला उदलच्या शौर्यगाथा व समाजाचा विचार प्रसार करीत भूजली निघाली .या भूजलीया उत्सवाला झाकीचे स्वरूप प्राप्त झाले होते .विविध प्रकारे सजावट करून समाज बांधव राखी तलावाकडे भूजलीया विसर्जन करण्याकरिता ढोल ताश्याच्या गजरात निघाले व राखी तलाव येथे भूजली विसर्जन करून भूजली एकमेकाना देऊन भाईचाराचा संदेश देण्यात आला.

असल्याचे समाजसेवक बबलू दुधबर्वे यांनी सांगितले . याप्रसंगी मत्स्य विकास महामंडळ चे माजी अध्यक्ष अशोक बर्वे , समाजाचे युवा नेते पी .टी .रघुवंशी ,नगरसेविका अहिरकर ,माजी नगरसेविका पुष्पा बर्वे , गोपाल बर्वे ,नत्थू बर्वे , आकाश अहीरकर , बबलू दुधबर्वे ,रतीमामा रघुवंशी , जीयालाल चंदनबटवे , मोनू रघुवंशी ,प्रकाश मोरेशिया ,माणिक ताकोत ,लक्ष्मी अहिरकर ,अनुबाई चंदनबटवे व इतर समाज बांधव मोठया प्रमाणात सहभागी झाले होते .

ग्रामीण भागात अनेक परंपरा अलीकडे रास होत आहे. मात्र अशा परिस्थितीतही भुजली सणाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी स्नेहबंधनाची नाती विणली. रामटेक येथे पार पडलेल्या भुजली आनंदोत्सवात गावकरी एकत्र आले, परंपरेला हा आंनदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. भाऊबहिणीचे नाते वृद्धिंगत करणारा रक्षाबंधन उत्सवात साजरा होतो, तसाच कहार व लोधी समाज रक्षाबंधनाचा पाळवा भुजली सणाने साजरा केला जातो, असाच भुजली सोहळा रामटेक येथे महिला पुरुष एकत्र येऊन साजरा केला. अलीकडे भुजली उत्सवाची सामाजिक परंपरा लयास जाऊ लागली होती. मात्र रामटेक येथील पुरुष ,महिलांनी व युवक युवतीने भुजलीसाठी पुढाकार घेतला. हया समाजाची भुजली परंपरा प्रचलित आहे आणि त्याला कायम ठेवण्याचे काम रामटेक येथील ग्रामस्थांनी व महिलांनी केली आहे. पूर्वीच्या काळापासून चालत आलेली परदेशी समाजाची भुजली परंपरा आंनदोत्सवाची जणू पर्वणी आहे. सायंकाळच्या सुमारास डफळी वाजवत गावातील महिलांना एकत्र करून नदीच्या थरावर नऊ दिवसाची भुजली विसर्जित करून एकमेकांना भुजली देऊन नमस्कार केला. स्नेह भेटीचा नातेसंबंध दृढ करणारा आणि एकतेची शक्ती वाढविणारा क्षण अख्या गावाणे एकत्र येऊन हा सण साजरा केला.

ह्यावेळी खणीकर्म विकास महामंडळ चे अध्यक्ष माजी आमदार आशिष जयस्वाल , पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे ,यात्रेत समाज बांधवा सोबत यात्रेत सहभागी झाले होते . आकर्षक झाकीने रामटेक वासियांचे लक्ष वेधले .डोळ्याचे पारणे फेडणारा हा अविस्मरणीय क्षण बघायला नागरिकांनी गर्दी केली होती.

गांधी चौकात मध्यभागी भूजलीया उत्सव येताच आमदार मल्लिकार्जुन रेड्डी ,नगराध्यक्ष दिलीप देशमुख , नगर परिषद उपाध्यक्ष शिल्पा रणदिवे ,नगरसेवक रामानंद अडामे , संजय बीसमोगरे , नगरसेविका कविता मुलमुले , वनमाला चौरागडे ,चित्रा धूरई ,आनंदराव चौपकर ,राहुल ठाकूर आदीनी यात्रेचे पुष्पपाकळ्यांनी स्वागत केले .