Published On : Tue, Apr 21st, 2020

आवाज लेकीचा बहुउद्देशिय संस्थेव्दारा गरजूंना मदत

स्वताजवळची रक्कम व घरचे धान्य देवून जपली सामाजिक बांधिलकी


रामटेक :- सम्पूर्ण जगभरात करोना संक्रमणाचा प्रादुर्भाव चालू आहे देशासह संपुर्ण राज्यातही संचारबंदी व लाॅकडाऊन असून हाताला काम नसलायाने गरीब मजूर कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळेस या संस्थेच्या सदस्यांनी स्वस्थ न बसता चालू असलेल्या संचारबंदीमध्ये ज्या गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांना मदत करण्याचे निश्चित केले या संस्थे तर्फे आतापर्यंत २१६ कुटुंबियांना अन्नधान्य वाटप करण्यात आलेले आहे यामध्ये तांदूळ, पीठ, तेल,तिखट,मीठ,हळद,सोयावडी,असे साहित्य देण्यात आलेले आहे मुख्य म्हणजे या संस्थेनी कुठल्याही राजकीय किंवा शासकीय कर्मचाऱ्याचा पाठिंबा न घेता सर्वप्रथम या संस्थेतील सदस्यांनी स्वतः जवळचे पैसे जमा केले स्वतःचा घरचे धान्य घेऊन वाटप केले नंतर आणखी मदत करायच्या उद्देशाने मित्र समूहाने कुणी आर्थिक तर कुणी धान्य देऊन मदत केली या कार्याला स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रामटेकचे मुंगमोले सर

यांचा देखील थोडा सहकार्य लाभले ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत औपचारिक, अनौपचारिक रित्या मदत केल्यामुळे संस्थेने कैची माईन, वाहीटोला, मनसर, हेटीटोला, दफाई, रिलायन्स पेट्रोल पंप चा मागील भाग , रामटेक, विनोबा भावे वॉर्ड, कवडक दुधाळादवाई मोहल्ला, इंदिरा नगर पिपरियापेठ शांतीनाथ कंडिल काही भाग , योगीराज हॉस्पिटल रामटेक जवळ काशीपूरा असलेल्या झोपडपट्टी मधील अत्यंत गरजूं असलेल्या एकूण २१६ घरांना धान्य वाटप केले तसेच त्यांना करोना पासून वाचण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन देखील केले

त्याचप्रमाणे पोलीस कार्यालय रामटेक येथे जाऊन जनतेचे संरक्षण करणारे पोलीस कर्मचारी यांच्यासाठी नास्ता तसेच चहाची देखील व्यवस्था केली तसेच जे कर्मचारी पोलीस कार्यालयात हजर नव्हते त्यांना रुजु असलेल्या स्थळावर जाऊन चहा नास्ता देण्यात आले आवाज लेकीचा या संस्थेच्या माध्यमातून लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून अनवरत मदत कार्य सुरू असून संस्थेचे अध्यक्ष जयताई मसराम सचिव देवानंद नागदेवे उपाध्यक्ष पियुष जांभुलकर कोषाध्यक्ष अश्विनी नागपुरे संस्थेचे सदस्य शुभम दुधबर्वे, समीर बोरकर, निखिल उमाळे, पवन बाजनघाटे अंकित बन्सोड अश्विन डुंडे, अंजली श्याम, सोनू दुधपचारे, श्रुतिका बावनकर, नेहा उरकुडे, मयुरी टेम्भुरणे काजल डोकारीमरे,भारती घरजाले इतर सदस्य उपस्थित राहून सहकार्य करीत आहे.