Published On : Tue, May 5th, 2020

बुद्धपौर्णिमेला गरजूंना मदत करा

Advertisement

– धम्मगुरू आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचे आवाहन
– जयंतीला ‘बुद्ध आणि त्यांचा धम्मङ्कचे करा वाचन

नागपूर: ४ मे तथागत गौतम बुद्ध यांनी शांती, मैत्री, करुणा आणि कल्याणाचा मार्ग सांगितला. त्याच मार्गाचा अवलंब करीत बुद्धपौर्णिमेला गरजूंना मदत करा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय धम्मगुरू तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले आहे. येत्या ७ मे रोजी बुद्धजयंती आहे. त्या पाश्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे.

बुद्धजयंती सामूहिकरीत्या साजरी करू नका, घरीच बसून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्मङ्क या ग्रंथाचे वाचन करा, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशभरात लॉकडाउन असून गरीब, गरजूंवर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा संकटकाळी समाजाची जबाबदारी वाढली आहे. ज्यांची आर्थिक स्थिती भक्कम आहे, अशा प्रत्येकांनी एका कुटुंबाची मदत करावी. हीच खरी बुद्धजयंती ठरेल, असेही ससाई म्हणाले.

२५०० वर्षांपूर्वी तथागत बुद्ध यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला. तो दिवस बुद्धजयंती म्हणून साजरा केला जातो. मागील दोन महिण्यांपासून कोरोना विषाणुचा जगावर संकट आला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी भौतिक अंतर (सुरक्षित शारीरिक अंतर)राखण्याची आज खरी गरज आहे. ही गरज ओळखून गर्दी टाळण्यासाठी बुद्ध जयंती सामूहिकरीत्या साजरी करू नका. भौतिक अंतर ठेवूनच कोरोनाला मुठमाती द्यायची आहे. उत्सवानिमित्त जमावामुळे अखंड समाजाची प्रतिमा मलिन होऊ नये, याचीही खबरदारी घेण्याची गरज आहे.

शहरातील शेकडो बुद्धविहारात जयंती साजरी केली जाते. काही ठिकाणी खीरदान, भोजनदान आणि खाद्य पदार्थांचे वितरण केले जाते. मात्र, कोरोनाच्या संकटाला मुठमाती देण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी खबरदारी घ्यायची आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये सामूहिक पद्धतीने जयंती साजरी करू नका. शहरातील सर्व बुद्धविहार कमिटीच्या पदाधिकाèयांनी याची खबरदारी घ्यावी. घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर त्रिशरण व पंचशील ग्रहण करून बुद्धजयंती साजरी करावी, गरजुंना एक दिवस मदत करून चालनार नाही तर शक्य असेल तेव्हा पर्यंत मदत करावी असे आवाहनही ससाई यांनी केले.