Published On : Tue, May 5th, 2020

बेला येथील दुकाने सुरू

Advertisement

ग्राम पंचायतीचा निर्णय

बेला: हॉटेल , पान ठेले, चहा खर्रा टपऱ्या, व हेअर सलून वगळता इतर दुकाने सुरू करण्यास बेला ग्रामपंचायतीने मान्यता दिल्याने अखेर मंगळवार 5 मे पासून येथील बाजारपेठ सकाळी सात ते बारा या वेळेत सुरू झाली. दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच यानिमित्ताने मुख्य रस्ता ग्राहकांनी गजबजला असे आनंदमयी चित्र पहायला मिळाले.

केंद्रशासनाने लोक डाऊन चे तिसऱ्या टप्प्यात लघु उद्योग धंद्यांना काही प्रमाणात कितीचा दिल्याने सोशल डिस्टन्स व स्वच्छता तसेच मास्क चे अटीवर बाजार येथील दुकाने सुरू करण्यात यावे असे फर्मान बेला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी काढले. घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये दररोज सकाळचे 5 तास बाजार ओळीतील किराणा भाजीपाले कापड दुकाने स्टील भांडे चप्पल दुकाने रेडिमेट जनरल स्टोअर स्टेशनरी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कारागिरीची दुकाने सुरू करण्यात यावे. याकरिता बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

शनिवारचे काय?
बेला येथे शनिवार ला आठवडी बाजार असतो. मात्र लॉक डाऊनलोड तो बंद झाला . परंतु मागील दोन शनिवारला भाजीपाला व किराणा विक्रेत्यांना धंदा करण्यास मुनादी देऊन मनाई करण्यात आली. त्यामुळे बेला व आसपासच्या असंख्य ग्राहकांना जीवनावश्यक वस्तु पासून वंचित व्हावे लागले. त्यामुळे पुढील शनिवारचे काय होणार? असा प्रश्न नागरिकांचे मनात निर्माण झाला आहे. दरम्यान आज आठवडी बाजार भरू नये परंतु स्थानिक दुकाने नेहमीप्रमाणे सुरूच ठेवण्यात यावी. अशी आग्रही मागणी उपसरपंच सुभाष तेलरांधे, काँग्रेसच्या महिला नेत्या मनीषा लोहकरे, मनोज लि खार, जयवंत तिमांडे, महिला बचत गटाच्या अंकिता व अपेक्षा ढाकणे , माया thool आदींनी केली आहे.

प्रतिक्रिया:
कोरोना महा मारीत लग्नसराईचा हंगाम वाया गेला. त्यामुळे कापड रेडिमेट स्टील भांडे वाजंत्री कोल्ड्रिंग व इतर अनेक धंद्याची बरकत गेली. बाजारात मंदीचे सावट आले आहे वेळ निघून गेल्यावर शिथिलता देऊन धंदेवाल्यांना सावरता येणार नाही असे वाटते.