Published On : Thu, Sep 5th, 2019

मुसळधार पावसाने वारेगाव पुलिया कोसळला

Advertisement

सुदैवाने प्राणहानी टळली.. वारेगाव- कामठी चा संपर्क तुटला

कामठी :-कालपासून सुरू झालेल्या संततधार मुसळधार पावसामुळे कामठी तालुक्यांर्गत येणाऱ्या कोलार नदीचा सर्व्हिस रोडचा जुना पूल कोसळून वाहून गेल्याच्या घटनेला दिवस लोटत नाही तोच कामठी वारेगाव मार्गावरील नवनिर्मित सिमेंट रस्ता बांधकाम च्या बाजूला असलेला वारेगाव पुला वरून जडवाहन गेल्याने ते जडवाहन पुलातच खचून गेल्याने पूल कोसळून वाहून गेल्याची घटना आज 4 सप्टेंबर ला सायंकाळी साडे पाच दरम्यान घडली .सुदैवाने जीवित हानी टळली असली तरी या एकमेव मार्गावरील वारेगाव पुलिया तुटल्याने कामठी -वारेगाव-खापरखेडा गावाचा संपर्क तुटला.

कामठी तालुका अंतर्गत येणाऱ्या कामठी वारेगाव-खापरखेडा सिमेंट रस्ता बांधकाम मागील एक वर्षांपासून सुरू असून कामठी छावणी परिषद सीमा संपुन वारेगाव कडे जाणाऱ्या मार्गावरील पुला ची सोय व्हावी तसेच या पुलावरून जाणाऱ्या वाहतूक दारांना सोयीचे व्हावे या मुख्य उद्देशाने या पुला च्या खाली सिमेंट पाईप घालून त्यावरून तात्पुरता रस्ता बांधून वाहतुक दारांसाठी सोयीचे केले होते.

दरम्यान या तात्पुरता रस्त्यावरील वारेगाव पुलावरून कामठी हुन वारेगाव-खापरखेडा कडे नेहमी ये जा करणाऱ्या वाहतूक दारांची रेलचेल मोठ्या प्रमाणात होती तसेच कामठी हुन कोराडी-खापरखेडा कडे जाणारा हा एकमेव मार्ग असून आशा हॉस्पिटल समोरील वारेगाव बाह्य वळण मार्गाने वाहतुकदारांची दिवस रात्र रेलचेल असते यानुसार आज दुपारी पाच च्या दरम्यान एक चारचाकी ट्रकचालक ट्रक क्र एम एच 40 ए ई 7411 ने सिमेंट विटा लादून वारेगाव हुन कामठी कडे सदर पुला वरून वाहून जात असता सततच्या संततधार पावसमुळे कमजोर झालेला हा रस्ता अधिक जडवाहनाने खचला ज्यामध्ये अर्धा ट्रक त्या खचलेल्या खड्यात फसला ज्यामुळे या पुला च्या सिमेंट पाईप सुद्धा वेगवेगळे झाल्याने पूल पूर्णतः खचला ट्रकचालक व क्लिनर कसाबसा जीव वाचवून बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. तर वेळीच या मार्गावरील पूर्ण वाहतूक ठप्प झाली व कामठी वारेगाव गावाचा संपर्क तुटला.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अरविंद हिंगे यांनी तहसिल कार्यालयिन पथकासह घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी करीत घटनेची चिंता व्यक्त केली तर पोलिस विभागाने सुद्धा भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तसेच वारेगाव बाह्य वळण मार्गावर बॅरिकेट्स लावून रस्ता बंद चा फलक लावून रस्त्यावर नाका बंदी लावण्यात आली.

संदीप कांबळे कामठी