Published On : Tue, Aug 29th, 2017

विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जोरदार तर मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई- महाराष्ट्र-गुजरातमध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अलर्ट IMD ने जारी केला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांवर जमा झालेले काळे ढग, सोसाट्याचा वारा आणि तुफान पाऊस पाहून मुंबईकरांना 26 जुलैचीच आठवण होत आहे. परंतु, हे वादळ किंवा ढगफुटी नसल्याचे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र पुढचे 24 तास मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

मराठवाड्यात येत्या 48 तासांत मुसळधार

येत्या 24 तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात येत्या 48 तासांत मराठवाड्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्‍य प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि नॉर्थ ईस्टच्या काही भागातही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.