Advertisement
नागपूर : नागपुरात मंगळवारी दुपारी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. उन्हाच्या कडाक्याचा महिना म्हणून ओळखला जाणाऱ्या एप्रिल महिन्यातही शहरात गारवा निर्माण झाला आहे.
शहरात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बारसल्याने रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. सोसाट्याच्या वाऱ्याने शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची माहिती आहे.त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या तीन -चार दिवसांपासून शहरात दररोज पाऊस पडत असल्याने कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे.