तालुक्यात संक्रमितानची संख्या पोहोचली 112 वर
रामटेक- अपेक्षे प्रमाणे कोरोणाची साखळी अध्यापही तुटू शकली नाही. रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे . आता रामटेक तालुक्यातील पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. तालुका व शहर मिळून ऐकून 9 संक्रमित आढळले आहे.
संक्रमित कोरोना रूग्ण संख्या 112 वर पोहचली आहे. आरोग्य केंद्र नगरधन ला 12 अँटी जन टेस्ट केली असता हाय रिस्क मधे असलेले
37 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष आहे 2 पॉझिटिव्ह निघाले असल्याचे माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र नगरधन चे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता काकडे यांनी दिली.
मणसर येथे दोन पुरुष पॉझिटिव्ह आढळले.व वनपवनी येथील 28 वर्षीय युवक पॉझिटिव आढळला.
या वेळी नायब तहसिलदार रासकल मॅडम , ग्राम पंचायत चे सचिव उइके , प्राथमिक आरोग्य केंद्र नगरधन चे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता काकडे आरोग्य सेवक रुकमुडे, किशोर वैद्य , पटांगे यांनी सहकार्य केले.
रामटेक येथील हाय रिस्क मध्ये असलेले नेहरू वॉर्ड मधे 1 महिला तर गांधी वॉर्ड येथे 1 पुरुष तर 1 महिला, तर टिळक वार्ड येथे 6 वर्षीय मुलगी अशे ऐकून 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची शोधा शोध घेणे सुरू आहे. तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या 112 वर गेली आहे.
त्यापैकी स्वस्थ झालेले आइसोलेशन मधे ठेवण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाइकवार यानी दिली.
तहसीलदार बाळासाहब मस्के , गट विकास अधिकारी बी. डबल्यू यावले,पोलीस निरीक्षक दिलिप ठाकूर , उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ प्रकाश उजगिरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाइकवार ,नगर परीषद चे अधिकारी राजेश सव्वालाखे ,रोहीत भोईर हे उद्भवणाऱ्या परिस्थीती वर लक्ष ठेऊन आहेत.