Published On : Mon, Aug 24th, 2020

ग्रामपंचायत शीतलवाडी प्लॅस्टिक कचरामुक्त अभियान सम्पन्न

रामटेक- प्लास्टिक कचरामुक्त अभियान जनजागृती कार्यक्रम ग्रामपंचायत शितलवाडी येथे घेण्यात आला असून श्रमदानातून प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून ग्रामपंचायत स्तरावर जमा करण्यात आले व शीतलवाडीला रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाला हेमके कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीुरवठा जी. प नागपूर हुमने स्वच्छ भारत मिशन जी. प नागपूर बी. डबल्यू.यावले खंड विकास अधिकारी पंचायत समिती रामटेक, चव्हाण ग्राम विस्तार अधिकारी पं. स रामटेक, मदन सावरकर ग्रामपंचायत सरपंच शितलवाडी परसोडा,
उपसरपंच विनोद सावरकर, रामटेक तालुकाचे सर्व ग्राम विकास अधिकारी गण , ग्राम पंचायत सदस्य शितलवााडी परसोडा, आंगणवाडी सेविका , मुख्याध्यापक जी. प शाळा , आंग नवाडी मदतनीस , म. रा. रोजगार हमी योजना कर्मचारी, ग्राम पंचायत स्वच्छता दुत , ग्राम पंचायत कर्मचारी वर्ग व इतर गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन भूल ग्रामविकास अधिकारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन के.एच. गायकवाड ग्राम विकास अधिकारी यांनी केले.