Published On : Tue, Oct 26th, 2021

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा नागपुर शहरात पाय ठेऊ देणार नाही : भाजयुमोने दिली धमकी..!

Advertisement

आरोग्य सेवक परीक्षांमध्ये राज्य सरकारने पुन्हा एकदा घोळ केला आहे. पेपर वेळेवर पोहोचलेच नाहीत, अनेकांना हॉल तिकीट नाही, वर्गात विद्यार्थ्यांचे नंबरच नव्हते, पेपर सिलपॅक नव्हते अश्या अनेक तक्रारी आमच्या समोर आल्या आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पुणे आणि अन्य परीक्षा केंद्रांवर अधिकाऱ्यांशी बोलून विद्यार्थ्यांना पेपर साठी वेळ वाढवून घेतली होती. तसेच अनेक ठिकाणी जाब विचारात निदर्शने ही केली.

राज्य सरकार हे निर्लज्ज पणाने वागत आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. सातत्याने तीच ती चूक करून विद्यार्थ्यांच जगणं मुश्कील करणाऱ्या मंत्री राजेश टोपे यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या नागपुर शहराच्या वतीने आज मेडिकल चौकात आंदोलनात केली.

यावेळी भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांनी तीव्र शब्दात आव्हान केले की आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा भाजयुमो त्यांना शहरात पाय ठेऊ देणार नाही व समस्त भाजयुमोचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरेल.

आंदोलनाला प्रमुख्याने भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवणी दाणी वखरे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष वामन तुर्के, भाजयुमो प्रदेश सचिव राहुल खंगार, भाजयुमो शहराध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, भायजुमो शहर महामंत्री सचिन करारे, भाजयुमो शहर महामंत्री दिपांशु लिंगायत, भाजयुमो शहर महामंत्री अमोल तिडके, भाजयुमो शहर संपर्क मंत्री मनीष मेश्राम, मंडळ अघ्यक्ष अमर धरमारे, सन्नी राऊत, बादल राऊत, शेखर कुर्यवंशी, पंकज सोनकर, यश सातपुते, घनश्याम ढाले, वैभव चौधरी, शौनक जहांगीरदार, ईशान जैन, संकेत कुकडे, गौरव हरडे, प्रसाद मुजुमदार, मनमित पिल्लारे, अमेय विश्वरूप, अमित बराई, आकाश भेदे , केतन साठवणे,आशिष मोहिते, अर्पित मलघाटे , सूरज कावरे, सूरज मते,स्वरूप कोडमलवार,सूरज दगडे, कौस्तुभ मुरमारे, साहिल शरणागत, रितेश पांडे, पियुष शेंडे, कुमार बांते, समीर मांडले,राहुल वाटकर,शुभम वेलंकीवार,पवन महाकाळकर,शुभम मौंदेकर, सोमेश गौर, स्वप्निल फ़ुल्सुन्गे,भावेश माताघरे, महेश बांगडे, गोविंदा काटेकर,एझाज शेख, अन्नू यादव, नितीन इटणकर, कमलेश शाहू, हर्षल मलमकर, ईशान जैन,देव यादव,राहुल ताकवत,उदय मिश्रा,आनंद गुप्ता, अक्षय शर्मा,शिवम पांढरीपांडे,राहुल सावड़िया,कमलेश बोमिलवार, सौरभ पराशर, विक्की किरपाने, आनंद कश्यप, विक्की बगले, राकेश भोयर, स्वप्निल भालेराव, अशुतोश भगत, गोविंद गाडगीलवारवार, चेतन धार्मिक, गोलु बोरकर, अंकित वानखेडे, शिव कटरे, अक्षय आष्टीकर व पादाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.