Published On : Sat, Jul 27th, 2019

आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केली इंदिरा गांधी रुग्णालयाची पाहणी

Advertisement

नागपूर: आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी शनिवारी (ता.२७) इंदिरा गांधी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी नगरसेविका परिणिता फुके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपा आरोग्य उपसंचालक डॉ. तुमाने, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरीता कामदार, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण गंटावार आदी उपस्थित होते.

यावेळी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी इंदिरा गांधी रुग्णालयातील रुग्ण तपासणी विभाग, एक्स रे विभाग, प्रसुती विभाग, औषध भांडार विभाग व अन्य विविध विभागांची पाहणी करून आढावा घेतली. नागरीकांना उत्तम आरोग्य सेवा देणे हे मनपा रुग्णालयांचे कर्तव्य आहे.

रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये, अडचणी येऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घ्या. रुग्णालयात नेहमी स्वच्छता राहावी यासाठी विशेष काळजी घ्या. रुग्णालयात भेडसावणा-या समस्या व अडचणींची माहिती वेळोवळी विभागाला देण्यात यावी. याशिवाय रुग्णालयात आवश्यक दुरुस्त्यांबाबतचे पत्र देउन त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचेही निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

इंदिरा गांधी रुग्णालयातील डागडुजीच्या कामामध्ये दिरंगाई होत असल्याने नगरसेविका परिणिता फुके यांनी वारंवार कंत्राटदारांना सांगुनही कोणतिही कार्यवाही करण्यात आली नाही. यासंबंधी त्यांच्या तक्रारीवर दखल घेत आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी संबंधित कंत्राटदाराकडून कामाचा आढाव घेत लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.